कोकण

राम जन्मला गं सखे, राम जन्मला

CD

swt३०१०.jpg
९२४३२
कुडाळः येथील श्री देव कुडाळेश्‍वर मंदिरात श्रीरामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. (छायाचित्रः अजय सावंत)

राम जन्मला गं सखे, राम जन्मला
कुडाळात रामनवमी उत्साहात; कुडाळेश्वर मंदिरात श्रीरामाचा जयघोष
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३० ः येथील श्री देव कुडाळेश्‍वर मंदिरासह तालुक्यात ठिकठिकाणी आज श्रीरामनवमी उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती.
येथील श्री देव कुडाळेश्‍वर मंदिरात गुढीपाडव्यापासून श्रीरामनवमी उत्सवाला प्रारंभ झाला. गुढीपाडवा ते श्रीरामनवमी या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसह दशावतारी नाटक, कीर्तने, भजने आदी कार्यक्रम झाले. उत्सव कालावधीत श्री देव कुडाळेश्वर महाराजांची विविध रुपात पूजा बांधण्यात आली. पालखी सोहळ्यासह श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
श्रीरामनवमीनिमित्त आज सकाळी लघुरुद्र, सतीश कुंटे (कुडाळ) यांचा भक्तीसंगीत कार्यक्रम, श्रींच्या उत्सवमूर्तीचे आगमन, पुरुषोत्तम पोखरणकर बुवा यांचे श्रीराम जन्मावर आधारीत कीर्तन, दुपारी ‘राम जन्मला गं सखे, राम जन्मला’ अशा जयघोषात श्रीरामजन्म सोहळा झाला. नंतर प्रसाद (सुंठवडा) आणि श्रींची पालखी मिरवणूक, सायंकाळी ४.३० वाजता चेंदवणकर दशावतार मंडळ (देवेंद्र नाईक प्रस्तुत, चेंदवण) यांचे ‘भक्ती महिमा’ नाटक, रात्री श्रींची पालखी मिरवणूक, श्री देव कुडाळेश्वर मित्रमंडळाचे ‘आगासलो तो मागासलो’ विनोदी नाटक, पार्सेकर दशावतार मंडळाचे ''पुत्र नवसाचा'' नाटक आदी कार्यक्रम झाले. दुपारी आमदार वैभव नाईक यांनी श्री देव कुडाळेश्वर मंदिरात भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले.
तालुक्यातील श्री लक्ष्मीनारायण मंदिर वालावल, श्री स्वयंभू रामेश्‍वर मंदिर अणाव आदींसह ठिकठिकाणी श्रीरामनवमी उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. सर्वत्र श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. वालावल येथील श्री रामनवमी उत्सवानिमित्त मनोरमा चॅरिट्रेबल ट्रस्ट, वालावलच्यावतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ट्रस्ट अध्यक्ष दयानंद चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, ट्रस्टचे सचिव संदीप साळसकर, अवी वालावलकर, विशाल देसाई आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT