कोकण

जेव्हा नांदेल स्वच्छता तेव्हाच मिळेल मुक्तता

CD

- ratchl३०२.jpg ः
९२४७३
चिपळूण ः शहरातील स्वच्छता रॅलीमध्ये सहभागी झालेल्या महिला.
-ratchl३०३.jpg ः
९२४७४
टाकाऊ वस्तूपासून केलेले सुशोभीकरण.
-
चिपळुणात स्वच्छता रॅली

महिला बचत गटांचा सहभाग; संदेशानातून प्रबोधन ; प्लॅस्टिक मुक्ती संदर्भात जनजागृती


सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३० ः जेव्हा नांदेल स्वच्छता तेव्हाच मिळेल मुक्तता..., सुंदर पहाट आणूया, भारत देशाला स्वच्छ बनवूया..., स्वच्छतेचे मंत्र ध्यानी धरा, आरोग्य आपले निरोगी करा...यांसारख्या घोषणांनी बुधवारी चिपळूण शहर दणाणून गेले. निमित्त होते चिपळूण नगर पालिकेमार्फत महिला बचतगटांच्या माध्यमातून काढलेल्या भव्य स्वच्छता रॅलीचे... या वेळी उपस्थित शेकडो महिलांनी रॅलीद्वारे शहरवासियांना स्वच्छतेचा संदेश दिला.
चिपळूण पालिका व दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका योजना यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छतोत्सव उपक्रमांतर्गत शहरात बुधवारी स्वच्छता रॅली काढण्यात आली. मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेतील सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी, बचतगटातील महिला आणि सामाजिक संस्थांमधील महिलावर्गाने या रॅलीत मोठा सहभाग नोंदवला. पालिकेपासून या स्वच्छता रॅलीला सुरवात झाली. त्यानंतर ही रॅली बाजारपेठेकडून रंगोबा साबळेरोडमार्गे (कै.) अण्णासाहेब खेडेकर क्रीडासंकूल येथे सांगता झाली. या रॅलीमध्ये स्वच्छतेविषयी संदेश देणारे अनेक फलक महिलांनी हाती घेतले होते. शिवाय विविध घोषणांनीही परिसर दणाणून सोडला. प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, कार्यालयीन अधीक्षक अनंत मोरे, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते, आरोग्य निरीक्षक महेश जाधव, वलिद वांगडे, बापू साडविलकर, अश्‍फाक गारदी, दीपक किंजळकर, संकेत मोहिते, चिपळूण बचतगट समन्वयक प्रज्ञा गमरे यांच्यासह महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-
रत्नागिरीतही जनजागृती
दरम्यान, रत्नागिरी शहरात पालिकेतर्फे सायंकाळी रॅली काढण्यात. महिला बचत गटातील महिलांनी ही रॅली काढली. प्लास्टिक हटवा देश वाचवा, कापडी पिशवी घरोघरी, पर्यावरणाचे रक्षण करा, अशा विविध घोषणा देत प्लास्टिक मुक्तीसंदर्भात जनजागृती करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT