कोकण

ज्येष्ठ नागरिक संघाचा तळेरेत स्नेहमेळा उत्साहात

CD

swt३०१९.jpg
92463
तळेरेः पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक सेवा संघ स्नेहमेळाव्यात ७५ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला.

ज्येष्ठ नागरिक संघाचा तळेरेत स्नेहमेळा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ३०ः तळेरे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा वार्षिक स्नेहमेळावा येथील श्रीधर सुर्वे यांच्या बागेत उत्साहात झाला. यावेळी पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमाकांत वरुणकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकारी सूर्यकांत तळेकर उपस्थित होते. यावेळी संस्थापक सुरेश तळेकर, संघाचे सचिव दिलीप पाटील, तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, साळिस्ते सरपंच प्रभाकर ताम्हणकर यांच्यासह संघाचे पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. यावेळी संघातर्फे विविध क्षेत्रात यश मिळविलेल्या तसेच ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यामध्ये तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, उपसरपंच शैलेश सुर्वे, साळिस्ते सरपंच प्रभाकर ताम्हणकर, दारुम ग्रामपंचायत सदस्य शुभांगी कल्याणकर, प्रवीण अमृते, ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष वामन ताम्हणकर, संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांसह ७५ वर्षे पूर्ण झालेले बबन कान्जीर, सीताराम गुरव, सरिता साळिस्तेकर, अनंत केसरकर या ज्येष्ठांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास तळेरे, साळिस्ते, ओझरम, कासार्डे, शिडवणे, दारुम येथील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. आभार दिलीप पाटील यांनी मानले. मेळावा यशस्वी होण्यासाठी तळेरे ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अरुण भांबुरे, सुरेश तळेकर, दिलीप मुद्राळे, मोहन खानविलकर, श्रीधर सुर्वे, चंद्रकांत तळेकर, नामदेव पाटील यांच्यासह सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT