कोकण

- आयुर्वेद

CD

(टुडे पान २ साठी, सदर)
(२८ मार्च टुडे दोन)
आयुर्वेद .........लोगो

अभ्यंगपूर्वक व्यायाम

फोटो ओळी
-rat१०p८.jpg ः
९४७८५
डॉ. निरंजन गोखले
-

शरीराला तेल लावून झाल्यानंतर लगेच आंघोळ न करता व्यायाम करणे आवश्यक आहे. नववर्षाच्या संकल्पापुरती जी चार दिवस करण्याची गोष्ट होऊन गेली आहे तो व्यायाम नित्य करणे आवश्यक आहे. आज पाहिलं तर व्यायामाबद्दल प्रचंड आसक्ती आणि प्रचंड विरक्ती अशा दोन टोकाच्या बाजू समाजामध्ये पाहावयास मिळतात. म्हणजेच एकीकडे जिमचे वाढते प्रस्थ, पिळदार शरीरयष्टी कमावण्यासाठी जिममध्ये जाणे, प्रोटीन् शेक पिणे, तिथे अतिरेकी वजन उचलून जीवावर बेतेल इतका उरफाटा व्यायाम करणे या सगळ्याचं वाढत चाललेले प्रमाण आणि एकीकडे व्यायामाबद्दल प्रचंड अनास्था.. अगदी तरुण मुली असो किंवा मुलगे.. सुटलेलं पोट, वाढणाऱ्या मांड्या, बेढब होत जाणारं शरीर, त्यातून वाढणारे आजार इत्यादी अनेक गोष्टी एकीकडे असा प्रचंड विरोधाभास समाजामध्ये वाढत चालला आहे; पण या सगळ्यात शास्त्र काय सांगते ते पाहणे अत्यंत गरजेचे आहे. व्यायाम ही गोष्ट दिनचर्येत आली आहे म्हणजे ती नित्य करणेच गरजेचे आहे. त्याचं प्रमाण ऋतूनुसार, मनुष्याच्या प्रकृतीनुसार, गरजेनुसार, बदलानुसार, खाण्या-पिण्याच्या सवयीनुसार, रोगांनुसार बदलू शकते, कमी-जास्त होऊ शकते; पण करायचाय मात्र रोज काही अपवाद वगळता.

डॉ. निरंजन गोखले
-

व्यायाम हा अभ्यंगपूर्वकच केला पाहिजे. म्हणजे आपले स्नायू तेल लावल्यामुळे लवचिक होतील आणि केल्या जाणाऱ्या व्यायामाने स्नायूंना दुखापत होणार नाही. व्यायामामुळे होणारी शरीराची झीज आणि वाढणारा वात या आधी केलेल्या अभ्यंगामुळे नियंत्रणात राहील आणि शरीराला पुष्टी मिळेल. व्यायाम म्हणजे काय तर शरीराला आयास होईल, थोडे कष्ट पडतील असे कोणतेही कर्म म्हणजे व्यायाम; पण कष्ट म्हणजे ओबडधोबड कसेही करणं अपेक्षित आहे का? तर नाही. नियमबद्ध हालचाली, विशिष्ट अवयवांवर ताण येईल अशाप्रकारे केल्या जाणाऱ्या संतुलित हालचाली ज्याने शरीराला कोणताही अपाय होणार नाही अशा हालचाली म्हणजे व्यायाम. नाहीतर पूर्वी शारीरिक श्रम हे नित्यकामांमधून होतच होते. तरीही व्यायाम दिनचर्येत का सांगावासा वाटला असेल? कारण, विभक्त घन गात्रत्व म्हणजेच शरीरसौष्ठव, सुडौल शरीर, नित्य काम करण्याचा स्टॅमिना वाढणं या गोष्टी नित्य कामांमधून होत नाही. व्यायाम किती करायचा? तर अर्धशक्ती इतकाच व्यायाम करायचा. म्हणजे किती? तर तोंडावाटे श्वास घ्यावासा वाटू लागला, कपाळावर, काखेत घाम येऊ लागला की, व्यायाम थांबवावा. धाप लागली की, व्यायाम थांबवावा. यापेक्षा अतिरेकी व्यायाम करू लागलो तर आज जसे हार्टअॅटॅकचे व्हिडिओज् बघायला मिळतात, जिममध्ये व्यायाम करता करता पडला, तिथेच गेला तशी गत कदाचित होऊ शकते.
जास्त व्यायाम कोणी केलेला चालेल? कधी केलेला चालेल? तर जो बलवान मनुष्य आहे, रोज ज्याच्या जेवणात स्निग्ध पदार्थ असतात अशा लोकांनी तसेच थंडीच्या दिवसांमध्ये जेव्हा शारीरिक बल चांगलं आणि पचवायची ताकद वाढलेली असेल, निसर्ग सुसह्य असतो अशा वेळेला व्यायाम जास्त करायला हरकत नाही. इतर काळामध्ये म्हणजे उन्हाळा, शरद ऋतू जेव्हा उष्णता जास्त असते अशा काळात कमीच म्हणजे थोडासाच व्यायाम करावा. ज्यांना वाताचे, पित्ताचे आजार आहेत ज्यांना अजीर्ण झाले आहे, कालचं जेवण पचलं नसेल तर लहान मुलांनी आणि वृद्ध माणसांनी व्यायाम करू नये. अति खाऊन, प्रोटिन शेक पिऊन, एसी लावून, सप्लिमेंट्स घेऊन आपल्याला झेपेल त्यापेक्षा जास्त प्रमाणात वजन उचलणं या प्रकारच्या व्यायामामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकतं. त्यामुळे जिमला जात असाल तर एसी असता कामा नये. स्टेरॉईड्स टाळा. भरपेट नाश्ता करून जाऊ नका. चांगला ट्रेनर असेल अशाच ठिकाणी जा आणि अतिरेक टाळा.
घरच्या घरी व्यायाम करणार असाल तर सूर्यनमस्कार, जोर, बैठका, योगासने यासारखे व्यायाम नित्य केले तरी पुरेसे आहेत. यथायोग्य व्यायामामुळे काय होते? हलकेपणा येतो. हर प्रकारची कामे करण्याचा स्टॅमिना वाढतो, अग्नी प्रदीप्त होऊन पचनशक्ती वाढते, साचलेला, वाढलेला मेद कमी होतो. सुटसुटीत शरीर, सुदृढ, दणकट शरीर प्राप्त होतं. मेदवृद्धीमुळे येणाऱ्या मानसिक ते शारीरिक सर्व आजारांना आळा बसतो. उत्साह वाढतो, मन फ्रेश होतं, नकारात्मकता निघून जाते, सकारात्मकता वाढीस लागते. ओव्हरऑल व्यक्तिमत्व उजळून निघते त्यामुळे अजिबात व्यायाम न करण्यापेक्षा थोडा करा. रोज करा स्वस्थ राहा मस्त राहा.

(लेखक वाग्भट चिकित्सालय, रत्नागिरी आयुर्वेद चिकित्सालय, आडिवरे येथे कार्यरत आहेत.)
-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT