कोकण

पावस आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम संथगतीने

CD

-rat११p२३.jpg ः
९५०४५
पावस ः पावस प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या नूतन इमारतीचे काम संथगतीने सुरू आहे.
-

पावस आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम संथगतीने

पावस, ता. ११ ः पावस परिसरातील रुग्णाला आरोग्याच्या सोयीसुविधा तातडीने मिळाव्यात यासाठी सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामाकरिता निधी उपलब्ध करून देण्यात आला; मात्र त्याचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने रुग्णांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
१९८५ मध्ये पावस प्राथमिक आरोग्यकेंद्राची स्थापना करण्यात आली. त्यानंतर आरोग्यकेंद्राच्या इमारतींचे नुतनीकरण करण्यात आले. २००० मध्ये इंडो जर्मन प्रकल्पांतर्गत इमारतीचे बांधकाम करण्यात आले. मात्र त्यानंतर दुरुस्तीकडे दुर्लक्ष न झाल्याने अनेक खोल्या नादुरुस्त झाल्या. अखेर जिल्ह्याच्या ठिकाणाहून सागरी मार्गावर मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथील आरोग्य केंद्र सुसज्ज सोयींनीयुक्त आरोग्यकेंद्र व्हावे या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले. आमदार उदय सामंत यांनी विशेष प्रयत्न करून जिल्हा वार्षिक नियोजन व इतर निधी उपलब्ध करून एकूण साडेतीन कोटीच्या कामाला मंजुरी देण्यात आली. या कामाचे भूमिपूजन करण्यात आले; मात्र काम सुरू होण्यास विलंब झाला. आता ठेकेदाराने काम सुरू केले आहे, मात्र इमारतीचे बांधकाम संथगतीने सुरू आहे.
-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

SCROLL FOR NEXT