कोकण

मठमध्ये देवतांचे मिरवणुकीने स्वागत

CD

swt११३०.jpg
९५१३६
वेंगुर्लेः मठ येथील श्री देवी सातेरी मंदिराची नवीन पाषाणे वाजत गाजत आणण्यात आली.

मठमध्ये देवतांचे मिरवणुकीने स्वागत
पुनःप्रतिष्ठापना सोहळाः ३ मे पर्यत चालणार उत्सव
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ११ः मठ येथील श्री देवी सातेरी व परिवार देवता पुनःप्रतिष्ठापना २८ एप्रिल ते ३ मे या कालावधीत करण्यात येणार असून त्यासाठीची नवीन पाषाणे मठ कुडाळ तिठा वेशीवरून वाजत गाजत, भाविकांच्या अमाप उत्साहात मठ सातेरी मंदिर येथे आणण्यात आली.
यानिमित्त मठ कुडाळ तिठा ते मठ परबवाडा सातेरी मंदिरपर्यतच्या रस्त्यावर रांगोळी काढली होती. रस्त्याच्या दुतर्फा पताका लावून हा परिसर सुशोभित केला होता. रविवारी सायंकाळी मठ गावातील शेकडो महिला नववारी साड्या नेसून व पारंपारिक पेहराव करुन, डोक्यावर तुलशी वृंदावन, हातात आरत्या घेवून तर पुरुष मंडळी व बालचमूही नूतन पाषाणाच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. ४ वाजता नवीन पाषाणांचे मठ कुडाळ तिठा येथे आगमन मावेनासा झाला होता. तिथून भव्य मिरवणुकीने व शिस्तबध्द पध्दतीने ही पाषाणे मठ सातेरी मंदिरपर्यत आणण्यात आली. रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होवू नये यासाठीही योग्य नियोजन केले होते. मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांसाठी वाटेत ठिकठिकाणी थंड पेयाची व्यवस्था केली होती. या मिरवणुकीत परबवाडा महिला मंडळ व मठ हायस्कूलच्या मुलींचे लेझीम पथक, टाकयेवाडी महिलांचे झांजपथक, कणकेवाडी महिलांचे भजन मंडळ, पिद्रावण राजापूरचे ढोलपथक सहभागी झाले होते. मठ गावातील अठराही वाड्यातील महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही मिरवणूक मठ स्वयंभू मंदिर येथे आल्यानंतर देवतांच्या संचारासह सातेरी मंदिर येथे नेण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौची सामन्यावर पकड, स्टॉयनिस अन् दीपक हुड्डा लढवला किल्ला

SCROLL FOR NEXT