कोकण

भिरवंडे येथील रोहन पायलट सेवेत दाखल

CD

97456
रोहन सावंत
----
97457
पल्लवी सावंत


भिरवंडे येथील रोहन
पायलट सेवेत दाखल
कणकवली,ता.२१ ः भिरवंडे गावातील कॅप्टन रोहन सावंत हे पायलट सेवेत दाखल झाले. डॉक्टर शंकर सावंत यांचे चिरंजीव रोहन यांनी व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तर त्यांची बहीण पल्लवी हिने एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
भिरवेडेतील डॉक्टर शंकर सावंत आणि त्यांची पत्नी डॉक्टर उमा तसेच डॉक्टर शिवाजी सावंत हे मुंबई येथे वैद्यकीय व्यवसाय करात. हे करत असताना गावातील शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक उपक्रमात सहभागी असणाऱ्या या कुटुंबातील कॅप्टन रोहन सावंत यांनी पायलटचे खडतर प्रशिक्षण नुकतेच पूर्ण केले. त्यानंतर तो एका खाजसगी संस्थेमध्ये वैमानिक म्हणून दाखलही झाला. रोहन यांनी मुंबई विद्यापीठाचे वैमानिक प्रशिक्षण पूर्ण केले आहे. पार्ले टिळकमध्ये प्राथमिक शिक्षणानंतर रोहन यांनी पायलट होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार विज्ञान शाखेतून पदवी घेतल्यानंतर खडतर असे वैमानिक प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तर त्यांची बहीण पल्लवी यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनीही पार्ले टिळक विद्यालय मुंबई येथून प्राथमिक शिक्षण घेतले होते. रोहन आणि पल्लवी या दोघांच्या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT