कोकण

रत्नागिरीत आज खासगी प्राथमिक शिक्षक

CD

२० (पान २ साठी)

खासगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाचे अधिवेशन

आज रत्नागिरीत आयोजन ; मंत्री, खासदार आमदारांची उपस्थिती

रत्नागिरी, ता. २२ ः महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक, शिक्षकेतर महासंघाचे राज्यव्यापी अधिवेशन उद्या (ता. २३) येथील जयेश मंगल पार्क येथे आयोजित केले आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सकाळी ९.३० वा. होणार आहे.
या संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी आमदार बाळ माने असून, कार्यक्रमाला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, आमदार योगेश कदम, आमदार शेखर निकम, उद्योजक रवींद्र सामंत, प्राथमिक शिक्षणाधिकारी वामन जगदाळे उपस्थित राहणार आहेत. रत्नागिरीमध्ये प्रथमच महासंघाचे अधिवेशन होत असल्याने रत्नागिरीतील खासगी प्राथमिक शाळांतील शिक्षकांनी नियोजन केले आहे. या अधिवेशनाला मंत्री व मान्यवर व्यक्ती, महासंघाचे विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दीपक घवाळी, उपाध्यक्ष विनोद नारकर, सचिव सुनील डांगे, कार्याध्यक्ष अरविंद सकपाळ, कार्याध्यक्ष समीर खोत, मुख्याध्यापिका प्रतिनिधी आसक्ती भोळे आणि सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी यांनी अधिवेशनाचे नियोजन केले आहे. अधिवेशनाची सांगता दुपारी ३ वा. होणार आहे. या वेळी आमदार तथा महासंघाच्या राज्य कार्याध्यक्षा उमा खापरे अध्यक्षस्थानी असून प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांच्यासह आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, आमदार नागो गाणार, अखिल भारतीय शैक्षिक महासंघाचे अतिरिक्त महामंत्री संजय राऊत, नगरपालिका शिक्षण मंडळ प्रशासनाधिकारी सुनील पाटील, गटशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files: अशोक खरातने पाच नरबळी दिल्याचा संशय; सरकारी वकील थेटच बोलले, कोर्टात नेमकं काय घडलं?

Maharajbagh Zoo: महाराजबागेतील २५८ प्राण्यांची होरपळ; सव्वाशे वर्षांचा वारसा प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे धोक्यात

Bhandara News: महसूल विभागातील तीन बडतर्फ, तिघे निलंबित; बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळविल्याचे प्रकरण

Latest Marathi News Live Update : अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ

"किती ती ओव्हरॲक्टिंग ! " बिग बॉस मराठीचा VIRAL प्रोमो पाहून संकेत-सुपर्णावर प्रेक्षकांनी केली टीका

SCROLL FOR NEXT