कोकण

बांद्यात रस्त्यावरील खड्ड्यांत वृक्षारोपण

CD

97833
बांदा ः ग्रामपंचायत कार्यालयासमोरील रस्त्यावर वृक्षारोपण करताना साईप्रसाद काणेकर. शेजारी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

बांद्यात रस्त्यावरील खड्ड्यांत वृक्षारोपण

ठाकरे गटाचे आंदोलन; प्रशासनाचे वेधले लक्ष

बांदा, ता. २२ ः शहर ग्रामपंचायत कार्यालयासमोरील रस्त्यालगत अवजड वाहतुकीमुळे भलामोठा जीवघेणा खड्डा पडला असून यामुळे वेळोवेळी अपघात झाले आहेत. हा खड्डा तातडीने बुजविण्याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज ठाकरे शिवसेना बांदा शहर प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी खड्ड्यात वृक्षारोपण केले.
मुंबई-गोवा महामार्गवरून शहरात येण्यासाठी हा अंतर्गत रस्ता आहे. या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी तसेच दिवसा देखील अवजड वाहतूक सुरू असते. या रस्त्यावर शाळा व महाविद्यालय असल्याने मुलांची देखील वर्दळ असते. गेल्या चार दिवसांत या ठिकाणी अवजड वाहतुकीमुळे दोन अपघात झाले होते. रस्त्यालगत भलामोठा खड्डा पडला असून यामुळे वाहने हाकणे धोकादायक ठरत आहे. त्यामुळे तात्काळ याची दखल घेत खड्डा बुजवावा, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली. यावेळी काणेकर यांच्यासह अनिश केसरकर, सागर मोर्ये, प्रथमेश पडवळकर, ओंकार नाडकर्णी, मंदार देसाई, भाऊ वाळके, मनसेचे माजी बांदा विभाग अध्यक्ष मिलिंद सावंत आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT