कोकण

अक्षयतृतीयेच्या मुहूर्ताला सोने खरेदीकडे कल

CD

३५ (पान ३ साठी)


अक्षयतृतीयेच्या मुहूर्ताला सोने खरेदीकडे कल

परंपरा कायम ; उन्हामुळे दुपारी बाजारपेठेत गर्दी कमी

रत्नागिरी, ता. २२ ः सोडतीन मुहूर्तापैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्‍या अक्षयतृतीयेच्या दिवशी सोने खरेदीला प्रतिसाद चांगला मिळाला. तर चारचाकी, दुचाकी वाहनांसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीवर अधिक भर होता. पण कपडे, मिठाईसह अन्य दुकांनामध्ये प्रतिसाद कमी होता. उन्हाच्या झळांमुळे दुपारच्या सुमारास बाजारपेठेमध्ये गर्दी कमी होती. सायंकाळी पुन्हा गजबज वाढली.
अक्षय तृतीया आणि ईद एकाच दिवशी असल्यामुळे सायंकाळच्या सुमारास बाजारपेठ परिसरात काहीप्रमाणात गर्दी होती. अक्षयतृतीयेची सुट्टीमुळे अनेकांनी सायंकाळी खरेदीला बाहेर पडणे पसंत केले. उष्मा वाढल्यामुळे ही परिस्थिती सगळीकडेच होती. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नवीन वस्तू, सोने खरेदी करण्याचा हिंदू परंपरेचा भाग आहे. कालांतराने गाड्या, मोबाईल आणि अन्य वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य दिले जाऊ लागले. सोने खरेदीची परंपरा अजुनही कायम असल्याचे रत्नागिरीतील सराफींकडून सांगण्यात आले. दिवसभरात समाधानकारक उलाढाल झाल्याचे व्यावसायीकांनी सांगितले. दिवसभरात रत्नागिरीतील डिलर्स्कडून चारचाकीची सुमारे पंचवीसहून अधिक वाहनांची तर त्यापेक्षा दुप्पट दुचाकींची विक्री झाली. मोबाईल दुकानांमध्येही ग्राहकांची रेलचेल होती. वाढती महागाई, उन्हाचा तडाखा यामुळे ग्राहक कमी असल्याचा अंदाज रत्नागिरीतील व्यापारी महासंघाचे शहराध्यक्ष गणेश भिंगार्डे यांनी वर्तविला आहे.
-------------
कोट
सोने खरेदीची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांकडून छोटी-मोठी खरेदी दिवसभर सुरू होती. प्रतिसादही चांगला मिळाला आहे.
- महेश खेडेकर, सचिव, सुवर्णकार सराफी संघटना
---
आंब्याचे दर चढेच
मुंबई, पुण्यामध्ये अक्षय तृतीयेला आंबा खरेदीसाठी खवय्यांनी गर्दी केली होती. यंदा वातावरणातील बदलांमुळे अपेक्षीत उत्पादन आलेले नाही. त्यामुळे दर चढेच आहेत. परिणामी खरेदी करताना अनेकांनी हात आखडता घेतला होता. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वाशी बाजारात १५ हजार पेटी कोकणातून दाखल झाली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक बाजारातही लोकांनी खरेदीसाठी उपस्थिती लावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dal Prices: सणासुदीपूर्वी महागाईचा झटका! साखर-कांद्यानंतर आता डाळी महागल्या, जाणून घ्या नवे दर...

Sugar Stocks: साखर तुमच्यासाठी महागली, मात्र शेअर्ससाठी 'गोड' झाली! साखर कंपन्यांचे अनेक शेअर्स 52-Week High वर

Marathi News Live Updates : भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

कल्याणमध्ये डॉक्टरांवर पुन्हा हल्ला! रुग्णाच्या नातेवाईकाकडून अरेरावीची भाषा वापरत बेदम मारहाण; धक्कादायक घटना CCTVत कैद

MHADA: भाडेतत्त्वावरील घरांसाठी नवे धोरण; म्हाडाचे घर भाड्याने कसे घेता येणार? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT