Mhada Konkan Mandal
Esakal
मुंबई : लाखमोलाचे घर भाड्याने देताना फसवणुकीच्या भीतीने अनेक जण कचरतात. त्यामुळे मुंबईसह एमएमआरमध्ये लाखो घरे असूनही गरजूंना मिळत नाहीत. त्या पार्श्वभूमीवर घरे भाडेतत्त्वावर दिली जावीत, मालक आणि भाडेकरूला सुरक्षितता मिळावी म्हणून राज्य सरकारच्या निर्देशानुसार म्हाडाने भाडेतत्त्वावरील घरांच्या धोरणाचा मसुदा तयार करून सरकारला सादर केला आहे. त्याचाच भाग म्हणून घर सहजपणे भाड्याने देता यावे किंवा भाड्याने मिळवता यावे म्हणून म्हाडाकडून स्वतंत्र पोर्टल तयार केले जाणार असून, ते नव्या वर्षात कार्यन्वित होणार आहे.