कोकण

‘राष्ट्रवादी’तर्फे सावंतवाडीत रमजान ईदच्या शुभेच्छा

CD

97865
सावंतवाडी ः मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देताना अर्चना घारे-परब.

‘राष्ट्रवादी’तर्फे सावंतवाडीत
रमजान ईदच्या शुभेच्छा
सावंतवाडी ः शहरातील कादरी मशिद येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद हा सण सर्वत्र उत्साहात एकोप्याने व उत्साहाने साजरा केला जातो. या ईदच्या निमित्ताने समाजातील बंधुभाव, आपुलकी, समता वृद्धिंगत होवो, अशी सदिच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, महिला निरीक्षक दर्शना बाबर-देसाई, महिला शहराध्यक्ष अँड सायली दुभाषी, हिदायतुल्ला खान, भाईजान आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते.
.................
जामसंडेतील तरुणाचा आकस्मिक मृत्यू
देवगड ः जामसंडे-बेलवाडी येथील तरुणाचा मृतदेह तालुक्यातील वळीवंडे येथे आढळला. प्रदीप राजाराम अदम (वय ४२), असे त्याचे नाव आहे. ही घटना काल (ता. २१) सायंकाळी सातच्या सुमारास निदर्शनास आली. घटनेची येथील पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप अदम मोलमजुरीची कामे करीत. वळीवंडे येथे ते मृतावस्थेत आढळले. याबाबतची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी येथील पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली. अधिक तपास पोलिस नाईक महेंद्र महाडिक करीत आहेत.
..............
लिंगडाळगावमधून विवाहिता बेपत्ता
देवगड ः तालुक्यातील लिंगडाळगाव लोकेवाडी येथील एक विवाहिता काल (ता. २१) सकाळपासून बेपत्ता झाली आहे. सुनीता राघो लोके (वय ४७) असे तिचे नाव आहे. याबाबत येथील पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिता लोके ही विवाहिता काल सकाळच्या सुमारास घरात कोणास काहीही न सांगता निघून गेली. तिचा सर्वत्र शोध घेऊन सापडली नसल्याने येथील पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस हवालदार उदय शिरगावकर अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT