कोकण

भाग्यलक्ष्मी पॅनेलचेच वर्चस्व राहील

CD

98334
सिंधुदुर्गनगरी ः प्राथमिक शिक्षक पतपेढी पंचवार्षिक निवडणुकीसाठी भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलतर्फे श्री देव रवळनाथ मंदिर येथे प्रचाराचा प्रारंभ झाला. या वेळी पॅनेल प्रमुख राजन कोरगावकर, नारायण नाईक, सचिन मदने आदी.

भाग्यलक्ष्मी पॅनेलचेच वर्चस्व राहील

राजन कोरगावर; शिक्षक पतपेढी निवडणुकीसाठी प्रचाराला प्रारंभ

ओरोस, ता. २४ ः सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी निवडणूक १४ मे रोजी असून या निवडणुकीत भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व राहील, असा दावा पॅनेल प्रमुख राजन कोरगावकर यांनी पत्रकार परिषदेत केला. पॅनेलच्या प्रचाराचा प्रारंभ आज ओरोस श्री देव रवळनाथ मंदिर येथे श्रीफळ वाढवून करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष नारायण नाईक, जिल्हा सरचिटणीस सचिन मदने, महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेचे अनंत राणे, जिल्हा सरचिटणीस सुहास सावंत, महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार, जिल्हा सरचिटणीस शिवाजी गावीत, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र जोईल, जिल्हा सरचिटणीस दिलीप मस्के, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ प्राथमिक शिक्षक संघटनेचे किशोर कदम, प्राथमिक व उच्च प्राथमिक मुख्याध्यापक सेवा मंडळ महाराष्ट्रचे दत्तराज फोंडेकर उपस्थित होते.
जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक १४ मे रोजी जाहीर झाली. या निवडणुकीत प्राथमिक शिक्षक समिती, पदवीधर केंद्रप्रमुख सभा, प्राथमिक शिक्षक संघ, कास्ट्राईब महासंघ, प्राथमिक व उच्च प्राथमिक मुख्याध्यापक सेवा मंडळ या प्राथमिक शिक्षक संघटना एकत्र येऊन भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढविणार आहेत. या पॅनेलचे प्रमुख म्हणून शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस कोरगावकर यांची निवड केली आहे. एकूण १५ जागांसाठी निवडणूक होणार असून भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलचे तालुका सर्वसाधारण क्षेत्र उमेदवार विजय सावंत (कुडाळ), श्रीकृष्ण कांबळी (कणकवली), मंगेश कांबळी (मालवण), सीताराम लांबर (वेंगुर्ले), महेश काळे (दोडामार्ग), गोविंद शेर्लेकर (सावंतवाडी), संतोष राणे (देवगड), संतोष मोरे (वैभववाडी) हे उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. जिल्हा सर्वसाधारण क्षेत्र पुरुष नारायण नाईक व संतोष राणे, जिल्हा सर्वसाधारण क्षेत्र महिला ऋतुजा जंगले व समीक्षा परब, जिल्हा इतर मागास प्रवर्ग महेंद्र पावसकर, जिल्हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्ग चंद्रसेन पाताडे, जिल्हा भटक्या जाती विमुक्त जमाती प्रवर्ग संजय पवार हे उमेदवार निश्चित करण्यात आले असल्याचे कोरगावकर म्हणाले.
---
२५ वर्षे पॅनेलचे वर्चस्व
भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलचा प्रचाराचा प्रारंभ प्रसंगी सर्व उमेदवार उपस्थित होते. गेली २५ वर्षे भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलचे वर्चस्व प्राथमिक शिक्षक पतपेढीवर राहिलेले असून विद्यमान संचालक मंडळाने विविध सभासद हिताच्या योजना राबवून स्वच्छ व पारदर्शक कारभारामुळे संस्थेला २०२२-२३ या आर्थिक वर्षात साडेसहा कोटींचा नफा झाला. विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता सभासदांनी बहुमताने भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलच्या सर्व १५ उमेदवारांना मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन कोरगावकर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT