कोकण

ठाकरे गटाच्या नेत्यांना बारसूत प्रवेशबंदी

CD

पान १ साठी)

९८७३६

ठाकरे गटाच्या नेत्यांना बारसूत प्रवेशबंदी
पोलिसांनी बजावल्या नोटिसा; खासदारासंह ५ प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश
रत्नागिरी, ता. २६ : तुम्ही मोठ्या प्रमाणात जनतेच्या संपर्कात असलेले लोकप्रतिनिधी आहात. तुमच्या उपस्थितीने तसेच वक्तव्याने जनप्रक्षोभ होऊ शकतो. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, अशा आशयाच्या नोटिसा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्यासह जिल्हाप्रमुख विलास चाळके व प्रमुख ५ पदाधिकाऱ्‍यांना शहर पोलिसांनी बजावल्या; मात्र नोटीस मिळूनदेखील ठाकरे गटाचे खासदार राऊत यांच्या नेतृत्वाखाली बारसूमध्ये दाखल झाले.
दोन दिवसांपासून राजापूर तालुक्यातील बारसू, गोवळ, धोपेश्‍वर, नाटे आदी परिसरात महाराष्ट्र शासन औद्योगिक विकास महामंडळाकडून रिफायनरी पेट्रोकेमिकल उद्योगाच्या तपासणीकामी ड्रोन सर्वेक्षणासह भूसर्वेक्षणाचे कामकाज सुरू झाले आहे. या सर्वेक्षणाला स्थानिक ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला. संपूर्ण गाव रिफायनरीविरोधात पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले. विरोधकांचे जथ्येच्या जथ्ये या सर्वेक्षणाचे काम अडवण्यासाठी पुढे आले. सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यापूर्वीच जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी मनाई आदेश लागू केला आहे. स्थानिक ग्रामस्थांसमोर चिथावणीखोर वक्तव्य करून त्यांना प्रकल्पाविरोधात उतरवले जाण्याची दाट शक्यता वर्तवून ४५ लोकांना जिल्हाबंदीसह गावबंदी केली. तसेच काहींची धरपकड अद्यापही सुरूच आहे, मात्र मंगळवारी (ता. २५) बारसू परिसरात महिलांनी मोठे आंदोलन केले. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याविरोधात ठाकरे सेनेचे खासदार विनायक राऊत यांनी शासनाच्या विरोधात कडाडून टीका केली. आंदोलकांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले होते. खासदार राऊत व शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या वक्तव्यातून जनप्रक्षोभ होऊ शकतो व कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल, या भीतीने शहर पोलिसांनी आज संबंधितांना नोटिसा बजावल्या.

प्रमुख पदाधिकारी
खासदार विनायक राऊत यांच्यासह जिल्हाप्रमुख विलास चाळके, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, तालुकाप्रमुख प्रदीप ऊर्फ बंड्याशेठ साळवी, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे आदींसह प्रमुख पदाधिकाऱ्‍यांना फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४९ प्रमाणे नोटीस बजावली आहे. शासन आदेशाचे उल्लंघन/भंग केल्याचे कृत्य/कृती केल्याचे निदर्शनास आल्यास कायद्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करून ही नोटीस न्यायालयात पुरावा म्हणून सादर करण्यात येईल, अशी नोटीस शहर पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या सहीनिशी बजावली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

Poha Chila Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा हेल्दी अन् टेस्टी पोहा चिला, एकदम सोपी आहे रेसिपी

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

SCROLL FOR NEXT