कोकण

राजापूर-कोदवलीबरोबरच अर्जुना नदीतील होणार गाळ उपसा

CD

फोटो ओळी
-rat३०p३६.jpg- KOP२३L९९६२५ राजापूर ः अर्जुना नदीपात्राची पाहणी करताना मुख्याधिकारी प्रशांत भोसले, उपअभियंता विनय साळुंखे, हनिफ काझी, आजिम जैतापकर आदी.


कोदवलीबरोबरच अर्जुना नदीतील गाळ उपसाणार
आजपासून कार्यारंभ ; पाटबंधारेकडून कामाचे नियोजन
राजापूर, ता. ३० ः कोदवली नदीपात्रातील गाळाचा उपसा सुरू आहे. आता अर्जुना नदीपात्रातील गाळाचा उपसा केला जाणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या सुचनेनूसार अर्जुना नदीपात्रातील गाळ उपसा पाटबंधारे विभागाकडून करण्यात येणार आहे. १ मे रोजी या कामाची सुरवात होणार आहे. अर्जुना-कोदवली नद्यांचा संगम परिसरासह संगमाच्या वरचा भाग आणि संगमाच्या खालचा भाग या परिसरातील गाळाचा उपसा केला जाणार आहे.
गाळ साचलेल्या अर्जुना नदीपात्राची मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांच्यासह पाटबंधारे विभागाचे उपअभियंता विनय साळुंखे यांनी पाहणी केली. माजी नगराध्यक्ष हनिफ काझी, आजिम जैतापकर आदी उपस्थित होते. या गाळ उपशासाठी एक डोझर, एक पोकलेन व दोन डंपर्स आदी यंत्रसामुग्री दाखल होणार आहेत. पालकमंत्री श्री. सामंत यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या सूचनेनुसार अर्जुना नदीपात्रातील गाळाचा उपसा केला जाणार आहे. कोदवली धरणातील उपसलेला गाळ ज्या बागायतदारांना हवा असेल त्यांनी स्वतः डंपर उपलब्ध करून न्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी श्री. भोसले यांनी केले आहे. गाळ ज्या बागायतदारांना हवा असेल त्यांनीही पालिकेचे मुख्य लिपीक जितेंद्र जाधव यांच्याशी संपर्क साधावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

LSG vs MI IPL 2024 : लखनौनं मुंबईची कडवी झुंज काढली मोडून; गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप

SCROLL FOR NEXT