कोकण

राणी लक्ष्मीबाईंच्या पुस्तकांचे वितरण

CD

२१ (टुडे पान ४ साठी)

- rat३p१५.jpg-
२३M००२१०
रत्नागिरी ः पुस्तकाचे वितरण करताना लेखक अॅड. विलास पाटणे. सोबत प्रवीण लाड, मंदार सावंतदेसाई, स्वप्नील सावंत आदी.
-----
उद्योजक प्रवीण लाड यांच्यातर्फे राणी लक्ष्मीबाईंच्या पुस्तकांचे वितरण

रत्नागिरी ः १८५७ च्या स्वातंत्र्यसमरामधील समस्त महिलांना प्रेरणादायी असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित पुस्तके स्वतः विकत घेऊन उद्योजक प्रवीण लाड यांनी शिरगाव येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षणसंस्थेच्या बीसीए कॉलेजमधील विद्यार्थिनींना प्रदान केले. या पुस्तकाचे लेखक अॅड. विलास पाटणे यांच्या हस्ते प्रातिनिधिक वितरण करण्यात आले. एका कार्यक्रमाप्रसंगी प्रवीण लाड यांनी पदवीप्राप्त सर्व विद्यार्थिनींना राणी लक्ष्मीबाईंचे चरित्र देण्याचे ठरवले. राणी लक्ष्मीबाईंनी प्रतिकूल स्थितीत ब्रिटिशांशी दोन हात केले. त्यांच्या अतुलनीय विराट पराक्रमाचे वर्णन आणि जीवनचरित्राचे लेखन अॅड. पाटणे यांनी केले. त्यामुळे हे पुस्तक विद्यार्थिनींनी जरूर वाचले पाहिजे, या हेतूने लाड यांनी ६० पुस्तके संस्थेत दिली. या कार्यक्रमाला महर्षी कर्वे स्त्री शिक्षणसंस्थेचे प्रकल्पप्रमुख मंदार सावंतदेसाई, प्रकल्प समन्वयक स्वप्नील सावंत, प्रकल्प समिती सदस्य शिल्पा पानवलकर, अॅड. श्रीरंग भावे, प्रसन्न दामले, उद्योजक प्रवीण लाड, प्र. प्राचार्या स्नेहा कोतवडेकर उपस्थित होत्या.
-

सती विद्यालयातील चार शिक्षकांचा निवृत्तीनिमित्त सत्कार

चिपळूण ः सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सती चिंचघरी येथील सेवानिवृत्त होणारे चारही कर्मचारी संस्थेच्यादृष्टीने अतिशय योगदान देणारे आहेत. शाळेची शिस्त, कामातील प्रामाणिकपणा आणि विद्यार्थ्यांवर प्रेम करणारे हे शिक्षक आहेत. खेर्डी हायस्कूलच्या पायाभरणी आणि उभारणीत त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांचे योगदान सह्याद्री शिक्षणसंस्था कधीही विसरणार नाही, असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी सती चिंचघरी येथे केले. सह्याद्री शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल खेर्डी-सती चिंचघरी विद्यालयात सहाय्यक शिक्षक भाग्यश्री मोघे, कृष्णत थोरात, जयसिंग कुंभार व रमाताई रकटे हे सेवानिवृत्त झाले. या चौघांचाही आमदार निकम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक संजय वरेकर यांनी प्रास्ताविक केले. सेवानिवृत्त होणाऱ्या चारही कर्मचाऱ्यांनी शाळेचे अतिशय उत्तम पद्धतीने प्रामाणिकपणे काम केल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आभार मानत विद्यालयास काही भेटवस्तू दिल्या. या वेळी स्कूल कमिटीचे सदस्य राजाभाऊ चाळके, निवास थोरात, महेश चाळके, रमेश चाळके, उपमुख्याध्यापक अमर भाट, पर्यवेक्षक पांडुरंग काळुगडे, पर्यवेक्षिका असावरी राजेशिर्के, राजेंद्र पवार, कलाशिक्षक तुकाराम पाटील आदींसह शिक्षक परिवार व सेवानिवृत्तांचे कुटुंबीय उपस्थित होते.
-

पुरोगामी शिक्षण समितीची गटशिक्षणाधिकाऱ्यांची भेट

चिपळूण ः तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नांबाबत चिपळूणचे गटशिक्षणाधिकारी दादासाहेब इरनाक यांची महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या चिपळूण शाखेच्या वतीने भेट घेण्यात आली होती. अनेक प्रलंबित प्रश्‍नांपैकी सातव्या वेतन आयोगाचे शिक्षकांना देण्यात येणाऱ्या स्टेटमेंटबाबत चर्चा करण्यात आली होती. शिक्षकांना वेतन आयोगाचे स्टेटमेंट लवकरच केंद्रवार वाटप करण्यात येईल, याची ग्वाही गटशिक्षणाधिकारी यांनी दिली होती. पुरोगामी संघटनेने प्रशासनाला सहकार्य करण्याचे दिलेले आश्‍वासन पूर्ण केल्याने शिक्षण विभागाने केंद्रनिहाय वाटप सुरू केले आहे. याबद्दल पुरोगामी संघटनेच्यावतीने तालुकाध्यक्ष शशिकांत सकपाळ, सरचिटणीस प्रताप मोहिते यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Virat Kohli RCB vs CSK : मी एप्रिलमध्येच बॅग पॅक केली होती.... विराटला स्वतःच्या संघावर विश्वास नव्हता?

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : पुणे-मुंबई हायवेवर वाहतूक कोंडी, वाहतूक संथ गतीने

SCROLL FOR NEXT