कोकण

संगमेश्वर-पाटण घाटमार्गासाठी लवकरच बैठक

CD

८ (पान २ साठी)

संगमेश्वर-पाटण घाटमार्गासाठी लवकरच बैठक

मुख्य अभियंता एस. एन. राजभोज ; ८० किमी अंतर वाचणार

संगमेश्वर, ता. ३ ः संगमेश्वर- रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या संगमेश्वर-पाटण घाटमार्गाचे काम हाती घेऊन ते पूर्णत्वास जावे यासाठी सध्या लोकचळवळ सुरू आहे. संगमेश्वर आणि पाटण तालुक्यातील जनता या कामासाठी खूप आग्रही आहे. हा रस्ता झाल्यास संगमेश्वरवासीयांचे साधारण ८० किमी अंतर वाचणार आहे. या कामाच्या सद्यःस्थितीचा आढावा घ्यावा, अशी विनंती घाटमार्ग समन्वय समितीचे समन्वयक संतोष येडगे यांनी मुख्य अभियंता एस. एन. राजभोज यांना केली आहे. येडगे यांच्या विनंतीनुसार, या घाटमार्ग कामाचा आढावा घेण्यासाठी मुंबईत लवकरच बैठक घेण्यात येईल, अशी माहिती मुख्य अभियंता राजभोज यांनी दिली आहे.
या घाटमार्ग कामाचे ७ मे १९९९ ला तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन झाले होते. संगमेश्वर ते चाफेर (पाटण) हा एकूण ४६.६०० किमीचा रस्ता आहे. यापैकी २६.६०० किमी एकेरी रस्ता तयार असून फक्त २० किमी रस्ता तयार करावा लागणार आहे. रत्नागिरी जिल्हा हद्दीतील ५.५०० किमी, तर सातारा जिल्हा हद्दीतील १४.६०० किमी अंतरामधील रस्ता शिल्लक आहे. या कामाला तातडीने मंजुरी मिळण्यासाठी शासनदरबारी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार असल्याचे येडगे यांनी सांगितले. घाटमार्ग डीपीआरसाठी महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी २०१८ या अर्थसंकल्पीय वर्षात ५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. या निधीसाठी आमदार शेखर निकम यांनी विशेष पाठपुरावा केला होता. घाटमार्गासंदर्भात येडगे यांनी मंत्रालयात जाऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे यांची भेट घेतली होती. या भेटीत येडगे यांनी या घाटमार्गाच्या कामातील त्रुटी सचिव (रस्ते) यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. घाटमार्ग कामाचा डीपीआरचे काम पूर्वी दोन्ही जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम मंडळाने वेगवेगळे करावे, अशी तरतूद होती; मात्र दोन जिल्ह्यातील बांधकाम मंडळात या कामाबाबत समन्वय होताना दिसत नव्हता. साळुंखे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोकण मुख्य अभियंता यांना निर्देश देत संपूर्ण घाटमार्गाचा डीपीआर रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम मंडळाने करून तसा प्रस्ताव शासनाला पाठवून देण्याच्या सूचना केल्या आहेत. साळुंखे यांच्या सूचनेप्रमाणे याबाबत तातडीची बैठक घेण्याची विनंती येडगे यांनी केली आहे.
-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT