कोकण

मुंबरकर, ढवण यांचा सिंधुदुर्गनगरीत सन्मान

CD

मुंबरकर, ढवण यांचा सन्मान
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा महिला व बाल विकास क्षेत्रात काम करीत असणाऱ्या समाजसेविका अर्पिता मुंबरकर (कणकवली) यांना २०१३-१४ चा, तर प्रज्ञा ढवण (कणकवली) यांना २०१४-१५ या वर्षाचा जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार महाराष्ट्रदिनी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व १०,००१ रुपयांचा धनादेश, शाल व श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीक्ष संजय भारुका, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ आदी उपस्थित होते.
...............
''चर्मकार विकास''च्या योजनांचा लाभ घ्या''
सिंधुदुर्गनगरी : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजबांधवांचे (चांभार, मोची, ढोर व होलार) जीवनमान उंचावणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळविण्याच्या उददेशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी शासकीय योजना महामंडळाच्या जिल्हा कार्यालयामार्फत विविध योजना राबविल्या जाणार आहेत. यात राज्याच्या अनुदान योजना, बीज भांडवल योजनांचा समावेश आहे. समाजबांधवांनी आवश्यक कागदपत्रे सादर करून या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''सुनीतासारखी बायको मिळाल्याबद्दल देवाचे आभार मानतो, माझ्यासारख्या...'' अरविंद केजरीवाल नेमकं काय म्हणाले?

Shikhar Dhawan Retirement: क्रिकेटला करणार गुडबाय? दुखापतीवर अपडेट देत शिखर धवन स्पष्टच बोलला...

Aishwarya Narkar: "हे तुम्हाला शोभतं का? असं म्हणू नका!"; ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकरचं सडेतोड उत्तर

Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणातील विशाल अग्रवालसह इतरांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीनाचा अर्ज मोकळा

Latest Marathi News Live Update : पुणे कार अपघात प्रकरणी आरोपींचा जामिनासाठी अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT