कोकण

खेड-खेडला आज 200 किमी बीआरएम

CD

खेडला आज २०० किमी बीआरएम
खेड, ता. ५ ः रत्नागिरी जिल्हा कार्यक्षेत्र असणाऱ्या सह्याद्री रँडोनिअर्स व खेड सायकलिंग क्लबच्या सहकार्याने शनिवारी (ता. ६) २०० किमी बीआरएम सायकलिंगचे आयोजन केले आहे. सायकल स्पर्धा विश्वातील एक वेगळा क्रीडाप्रकार म्हणजे बीआरएम. कोणाशीही स्पर्धा न करता दिलेल्या ‌‌वेळेत अंतर कापणे हेच यातील महत्वाचे वैशिष्ट्य आहे. अठरा वर्षावरील कोणालाही सहभागी होता येईल अशा या क्रीडाप्रकाराचे खेड शहरात प्रथमच आयोजन केले जात आहे. संध्या. ५.३० वा. विजय उपाहारगृह येथून मान्यवरांच्या हस्ते झेंडा फडकवून सायकलिंगला सुरवात होईल. तिथून सर्व सायकलस्वार कोलाड येथे पोचून लगेचच परतीचा प्रवास सुरू करतील. साडेतेरा तासाच्या आत म्हणजेच सकाळी सातच्या आत खेड येथे पोहोचतील. संपूर्णपणे सेल्फ सपोर्टेड असणारी ही राईड नाईट बीआरएम म्हणून ओळखली जाते. या इव्हेंटसाठी पंचवीसहून अधिक रायडर्स सहभागी झाले आहेत. वेळेत अंतर कापणाऱ्या रायडर्सना ऑडाक्स इंडिया रँडोनिअर्स क्लबतर्फे फिनिशर मेडलसह गौरवण्यात येईल. या नवीन क्रीडाप्रकाराच्या उद्घाटनावेळी सायकलप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन खेड सायकलिंग क्लबने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT