कोकण

शासकीय कामात अडथळा, आरोपीला शिक्षा व दंड

CD

१६ (पान ३ साठी)

शासकीय कामात अडथळा प्रकरणी एकास शिक्षा

रत्नागिरी, ता. ५ ः तपासाचे काम करत असताना पोलिस ठाण्यात येऊन शासकीय कामात अडथळा करणाऱ्याला न्यायालयाने दोषी ठरवले. त्याला एक वर्ष साधा कारावास आणि ३ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
वैभव लहुराज खराडे (वय ३५, रा. पेठकिल्ला, रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. संशयिताविरुद्ध पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे यांनी तक्रार दिली होती. बेपत्ता प्रकरणाचा तपास त्यांच्यावर सोपवण्यात आला होता. पोलिसांना चौकशीसाठी दोघांना २८ जानेवारी २०२१ ला शहर पोलिस ठाण्यात बोलावले होते. त्या वेळी संशयित वैभव खराडे त्या ठिकाणी अचानकपणे आला. त्याने मोठमोठ्याने वाद घातला. तो आकाश साळुंखेंच्या अंगावर धावून गेला होता. त्याने टेबलावरच्या काच रागाने उचलून जोरात आपटून फोडली होती. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. वर्षा प्रभू यांनी युक्तिवाद केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BANW vs INDW, T20I: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, राधा यादव-दीप्ती शर्माची धारदार गोलंदाजी

Fact Check : निवणुकीत लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डुकराची चरबी नसते; व्हायरल होत असलेला दावा खोटा

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौसमोर मुंबईनं नांगी टाकली; 5 षटकात 4 फलंदाज तंबूत

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

SCROLL FOR NEXT