कोकण

पुरवणी लेख- 13- नवसाला पावणारी! हाकेला धावणारी श्री देवी करंजेश्वरी !!

CD

ratvardha13.txt

----------
फोटो ओळी
1) ratvardha49.jpg- KOP23M00883 श्री देवी करंजेश्वरीचे तेजस्वी रूप
2) ratvardha50.jpg-KOP23M00885 श्री देवी करंजेश्वरीचे मंदिर

इंट्रो
---
साधारण इसवी सनाच्या आठव्या शतकापूर्वी देवी एका कुमारिकेच्या स्वप्नात आली. देवीने त्या मुलीजवळ हळदकुंकू मागितले. हळदकुंकू घेऊन मुलगी गेली असता देवी गुप्त झाली आणि आज गोवळकोट येथे मंदिर आहे त्या ठिकाणी प्रगट झाली. कालांतराने एका भक्तास स्वप्नात दृष्टांत देऊन माझ्या नथीतील मोती करंजीच्या झाडात अडकून पडला आहे. तो घेऊन ये. त्याप्रमाणे त्या भक्ताने करंजीच्या झाडात शोधाशोध केली असता मोती सापडला. करंजीच्या झाडात प्रगट झाली म्हणून लोक भक्तीभावाने देवी करंजेश्वरी या नावाने संबोधू लागले. ज्या ठिकाणी मोती सापडला त्या साक्षात्कारी स्वयंभू पाषाणाला अनेक शिंगे आहेत म्हणून त्या स्वयंभू ठिकाणाला शिंगासन् असे म्हणतात. तसेच ते पवित्र साक्षात्कारी ठिकाण म्हणजे देवीचे माहेर आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या देवीबद्दल स्वाभाविक श्रद्धा आहेत. काही कथांना त्यामुळे दंतकथेचे स्वरूप आले नाही तरच नवल.


हाकेला धावणारी श्री देवी करंजेश्वरी !

श्री देवी करंजेश्वरी मूर्तीविषयी-श्री करंजेश्वरी देवीचे रूप अत्यंत लावण्यपूर्ण देखणे, तेजस्वी आहे. देवीच्या नेत्रात हजारो मातांचे वात्सल्यभाव ओसंडून वाहताना दिसते. देवीची मूर्ती चर्तुभुज आहे. एका हातात भक्ताचे रक्षण करण्यासाठी खड्ग आहे, एका हातात ढाल आहे, एक हात सदैव आशिर्वादाचा आहे, एका हातात कुंकवाचा करंडा आहे, अंगावर सुवर्णभूषणे आहेत. कधी देवी नऊवारी साडीत तर कधी कुमारिकेच्या रूपात दृष्टांत देते. करंजेश्वरी देवी साक्षात आदिशक्ती पार्वतीचे रूप आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. ती करंजीच्या झाडात प्रगट झाली म्हणून तिच्या भक्तांनी करंजीचे तेल वापरू नये, असा संकेत आहे. उच्च कोटीतील समजला जाणारा नवचंडी याग तिच्या चरणी समर्पित करून कुळभक्त देवीच्या दर्शनाने कृतार्थ होतात. श्री करंजेश्वरीदेवी शाकाहारी आहे त्यामुळे देवस्थानाच्या आवारात धान्य वाळत घातले असता देवळाच्या अंगणात कोणताही पक्षी अथवा कोंबडा-कोंबडी फिरताना दिसणार नाही, असा देवीचा महिमा आहे. देवीचे निशाण ढोलकाठी म्हणजे देवीचा राखणदार आहे. मंदिराकडे तोंड करून उभे राहिले असता मंदिराच्या बाहेर उजव्या बाजूस त्याचे स्थान आहे.

पेठमाप माहेरहून गोवळकोट सासरकडे जड पावलांनी प्रवास -
आज अनेक वर्षाचा अनुभव आहे. देवीची पालखी माहेरी येताना फुलासारखी हलकी असते आणि सासरी गोवळकोट येथे जाताना पालखी खूप जड होते. हा साक्षात्कार श्री भोईराजांना पिढ्यानपिढ्या अनुभवण्यास मिळतो. देवीची पालखी भोईवाडी, चर्मकार समाज, भैरवकरवाडी, देऊळवाडी येथून गोवळकोट येथे गेल्यावर देवीचे पिढ्यानपिढ्या मानकरी काटकर, पोतदार, केळकर, नाक्ती, रेडीज, भैरवकर, फडणीस, भागडे यांच्या घरी पालखी बसवण्याचा मान आहे. त्यानंतर सकाळी पालखी होम लावण्यासाठी सहाणेवर येते. सहाणेवर होम लावण्याचा मान आग्रे यांचा, होमाला दोरा गुंडाळण्याचा मान काटकर यांचा, होम लावल्यानंतर बांबूला बांधलेला कोंबडा बांबू तोडण्याचा मान जगताप या घराण्याचा आहे. होमाला पालखी पाच प्रदक्षिणा घालते. सूर्य उगवता उगवता होम लागतो म्हणून त्याला भद्रीचा होम म्हणतात. गावातील आरत्या झाल्यांनतर गोवळकोट येथील सहाणेवर पालखी बसते. सहाणेवर फार मोठी जत्रा भरते.
करंजेश्वरी देवीचा महिमा अगाध आहे. गोवळकोट, पेठमाप, मजरेकाशी या गावात कुणाला सर्पदंश किंवा विंचू चावला तर त्या व्यक्तीला देवीच्या देवळात आणून ठेवतात. देवीच्या कृपाशिर्वादाने तो पूर्ण बरा होतो, व्याधीमुक्त होतो अशी श्रद्धा भावना आहे.

नवसाच्या येसूचा नाच !
येसू म्हणजे ज्यांना मुलगा नाही आणि देवीच्या नवसाने देवीच्या कृपाशिर्वादाने ज्यांना मुलगा झाला ती व्यक्ती मुलगा झाल्यावर त्याला सतत तीन वर्षे तुझ्यासमोर नाचवीन, त्याप्रमाणे त्या मुलग्याला नऊवारी साडी नेसवतात. नाकात शिक मोती (नथ) घालतात. नाक टोचण्याचा मान पिढ्यानपिढ्या पोतदार घराण्याचा आहे. पोतदार घराणे देवीची सेवा समजून येसूचे नाक टोचतात. असा नवसाचा मुलगा येसू म्हणजेच देवीचे रूप समजून भाविक येसूची खणानारळाने ओटी भरून ओवाळणी करतात. या विधीचे प्रमुख श्री. पवार यांच्या घराण्यात वंशपरंपरेने पिढ्यानपिढ्या हा मान चालत आलेला आहे. आताच्या पिढीतील अनंत बबन पवार, पेठमाप गणेशवाडी हे भक्तीभावाने हा विधी करतात. त्यांच्या जोडीला विनायक बुरटे, रघुनाथ बुरटे, रमेश कानापडे, सुनील साळवी, दत्तगुरू घरवेकर भक्तीभावाने साथ देतात. येसूच्या या पूर्वापार गाण्यावर ''डावरेपणचा पिवळा पोलका, मापकरी येसू चाले । सांभाळ सांभाळ येसू आपली बाय तू आम्ही जाते माहेरा देसा । माहेरा जाशी माहेरा जाशी आपले पापणीचे गुण विसरशी बारा महिन्यांनी येईन माघारी तुला कदर कवळ्याची, अंतरली घडी काय वर ठेवला पानाचा विडा । असे पारंपरिक गाणे म्हणून येसूचा नाच होतो आणि देवीला गाऱ्हाणे घातले जाते.
............जे बाय, करंजाई रेडजाई, सोमेश्वर देवा
.............सालाबादप्रमाणे पूजा करून, ओटी भरून नारळ ठेवला आहे त्याच्यावर रखवाली धरून, त्यांच्या मुलाबाळांना कामधंद्यात काही अडीअडचणी असतील, घरच्या असो किंवा बाहेरच्या असो त्या दूर कर, त्यांना आनंदाचे दिवस दाखव, आपली वाहवा करून दाखव, असे पाच खेळी आरज लावीत आहे हर हर महादेव !

हा आरज झाल्यानंतर दोन्ही पालख्या देवीच्या देवळाभोवती पाच प्रदक्षिणा घालतात. त्या वेळी सर्व ढोलकरी, ताशेवाले, अबदागिरीवाले यांच्या उत्साहाला उधाणाची भरती येते. प्रत्येक ढोलाचा थापा एकापेक्षा एक जोराने वाजवतात. तालबद्ध, लयबद्ध ढोल वाजवण्यात दंग होऊन देहभान विसरून ढोल वाजवत असतो. शेवटची देवळाभोवती प्रदक्षिणा घालताना पालखीवरील पिंजरी काढण्यात येते. भोईराज आपल्या हातातील काठीवरील अर्धचंद्राकृती खाचेत पालख्यांचे दांडे अडकवतात आणि पालखी उंच करून देवळाभोवती नाचवताना फटाक्यांची जोरदार आतषबाजी करतात. त्या वेळी देवीचा आनंदी आनंदाने ओसंडून जाणारा तेजस्वी चेहरा पाहून मन भारावून जाते, आनंदून जाते. पाचवी प्रदक्षिणा पूर्ण होताच देवीची पालखी देवळात नेली जाते आणि संपूर्ण शिमग्यामध्ये काही नजरचुकीने चुकीमाफी झाली असल्यास नारळ देऊन देवीला आर्जव घालून शिमगा सणाची समाप्ती होऊन देवी स्थानापन्न होते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करंजेश्वरी देवीचा शिमगा गुलालविरहित शिस्तबद्ध असा नावलौकिक मिळवून प्रसिद्ध आहे. देवीचा शिमगा सण झाल्यानंतर येसू आणि देवीचे निशाण सोबत खेळे गोवळकोट, मजरेकाशी, पेठमाप येथे घरोघर आरत्या घेतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT