कोकण

मंडणगड - शासनाने मागणी मान्य न केल्यास शेतकऱ्यांचा लढा सुरुच राहणार

CD

शिरगावमधील शेतकऱ्यांचा लढा सुरूच राहणार
राजकुमार निगुडकर ; लघुउद्योग वसाहतीसाठी जमीन अधिग्रहण
मंडणगड, ता. ८ ः कामगारदिनाच्या निमित्ताने शिरगाव येथील शेतकऱ्यांनी मंडणगड तहसील कार्यालयसमोर उपोषण करून लघुद्योग वसाहतीसाठी शासनाकडून करण्यात आलेल्या एकतर्फी जमीन अधिग्रहणाच्या समस्येकडे यंत्रणेचे लक्ष वेधले आहे. या विषयासंदर्भात जिल्हा उद्योगकेंद्रांच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले होते.
सक्तीचे एकतर्फी जमीन अधिग्रहणाविरोधात माजी सभापती राजकुमार निगुडकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी गेल्या ३२ वर्षांपासून आंदोलन केले आहे. सक्तीने करण्यात आलेले भूसंपादन व मूळ प्रयोजनासाठी जागेचा वापर झालेला नसल्याने आमच्या जागा आम्हाला शासनाने परत कराव्यात, या मागणीवर शेतकरी आजही ठाम आहेत. महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन उद्योगमंत्री व संबंधित सचिवांच्या सभेत सोवेली पंचक्रोशी सहकारी औद्योगिक वसाहत या संस्थेने शासकीय योजनेचा लाभ घेऊन काम न केल्याने उपरोक्त जागा शेतकऱ्यांना परत देण्यासाठी जिल्ह्याधिकारी यांनी कार्यवाही करावी. तसेच शासनाकडून घेतलेला निधी व्याजासह वसूल करावा, असा निर्णय झाला होता; मात्र राज्यात सत्तांतर झाल्याने परिस्थिती बदलली त्यातच नव्या मुख्यमंत्र्यांनी खेड येथील सभेत मंडणगड तालुक्यात औद्योगिक वसाहत सुरू करण्याचे संकेत दिल्याने संस्थेने जुन्या संस्थेचे पुनरूज्जीवन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत व केवळ शासनाची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे.
या संदर्भात शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याची प्रतिक्रिया माजी सभापती निगुडकर यांनी पत्रकारांना दिली आहे. जिल्हा उद्योग केंद्राने शेतकऱ्यांनी आश्वासित केल्यानुसार पुढील कार्यवाही न केल्यास स्वातंत्र्यदिनी पुन्हा उपोषणास बसण्याचा इशाराही शेतकऱ्यांच्यावतीने देण्यात आला आहे. दरम्यान, या विषयासंदर्भातील शासनाची भूमिका शासन अथवा त्यांच्या प्रतिनिधींनी वेळेवर सार्वजनिक करण्याची आवश्यकता तालुक्यातील जनतेमधून व्यक्त केली जात आहे. मंडणगडमधील ३० वर्षे रखडलेला प्रकल्प मार्गी लावणार की, नव्याने जमीन अधिग्रहण करून तालुक्यात नवीन औद्योगिक वसाहत सुरू करणार याविषयी अद्याप कुठलीही स्पष्टता नाही, असे असले तरी शासनस्तरावर या विषयासंदर्भात घडामोडी होताना दिसून येत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT