कोकण

मंडणगड नगरपंचायत कार्यक्षेत्रात 17 विकासकामांचे भूमिपूजन

CD

४९ ( पान ३ साठी)


-Rat८p४०.jpg ः
२३M०१५१६
मंडणगड ः शहरातील आदर्शनगर बोरीचा माळ येथे भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित आमदार योगेश कदम.
---------
मंडणगडमध्ये विकासकामांचे भूमिपूजन

मंडणगड, ता. ९ ः मंडणगड शहराचे नगरपंचायत कार्यक्षेत्रातील विविध प्रभागात नाविन्यपूर्ण योजनेच्या अंर्तगत २ कोटी ५ लाखांच्या निधीच्या विनियोगाच्या १७ विकासकामांचे भूमिपूजन सोमवारी आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
विकासकामांचे भूमिपूजन नारळ त्या त्या प्रभागातील ज्येष्ठ व मान्यवरांच्या हस्ते वाढवण्यात आले. यात आदर्शनगर बोरीचा माळ परकर गुरूजी यांच्या घराजवळ भूमिपूजन, सापटेवाडी उदय गोसावी यांच्या घराजवळ, दुर्गवाडी भैरी मंदिर भेकतवाडी भूमिपजून व जाहीर सभा, प्रमोद काटकर यांच्या घराशेजारी, साईनगर पटांगण येथे, धनगरवाडी येथे, कुंभारवाडी वाघजाई मंदिर येथे, तुरेवाडी येथे, कृष्णानगर येथे त्याचबरोबर परिवार पार्क मंडणगड येथेही भूमिपूजन करण्यात आले.
भूमिपूजन कार्यक्रमात येथील नागरिकांना संबोधित करताना मंडणगड शहराच्या विकासाकरिता आपण कटिबद्ध असल्याचे आमदार योगेश कदम यांनी सांगितले. दापोली-खेड शहरांबरोबर मंडणगड शहराचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण शासनदरबारी पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले. पायाभूत सुविधांची निर्मिती व विकासाच्या प्रश्नात राजकारण न करता सहकार्याची भूमिका ठेवण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले. या वेळी माजी सभापती आदेश केणे, अनंत लाखण, शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, बांधकाम सभापती प्रियांका लेंडे, नगरसेवक तथा शहरप्रमुख विनोद जाधव, आदेश मर्चंडे, सुभाष सापटे, प्रमिला किंजळे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

Omprakash Raje Nimbalkar : जनतेनेच निवडणुक हाती घेतल्याने विजयाचा मार्ग सुकर - ओमराजे निंबाळकर

Lok Sabha Election : पहिल्या उमेदवारावर विश्वास नसल्याने दोन फॉर्म भरण्यात आले; राजेश मोरे यांची ठाकरे गटावर टीका

Champions Trophy 2025: 'तर पाकिस्तानला न येण्याचं लॉजिकल कारण द्या', भारतीय संघाच्या भूमिकेबाबत माजी क्रिकेटरचं स्पष्ट वक्तव्य

Latest Marathi News Live Update: नाशिकात ५ तर दिंडोरीत ६ उमेदवारी अर्ज बाद

SCROLL FOR NEXT