कोकण

नारूर-खापरा देवाचा १७ पासून जत्रोत्सव

CD

01813
श्री देव खापरा

नारूर-खापरा देवाचा
१७ पासून जत्रोत्सव
कुडाळ ः तालुक्यातील प्रसिद्ध असलेला नारूर येथील श्री देव खापरा जत्रोत्सव १७ व १८ मेस साजरा होणार आहे, अशी माहिती देवस्थानच्या स्थानिक सल्लागार उपसमितीने दिली. नारूर येथील श्री देव खापरा जत्रोत्सव हा प्रसिद्ध असून एक वर्ष आड करून हा उत्सव साजरा होतो. या उत्सवाला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई, गोवा, कोल्हापूर, कर्नाटक अशा विविध भागातून मोठ्या प्रमाणावर भक्त येतात. श्री देवी महालक्ष्मी मंदिराच्या पटांगणात हा जत्रोत्सव साजरा होतो. यावर्षी हा जत्रोत्सव १७ व १८ ला साजरा होणार आहे. तरी सर्व भक्तांनी या जत्रोत्सवाला उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
----------
मळगावात उद्या ‘अश्रूंची झाली फुले’
सावंतवाडी ः मळगाव येथे शुक्रवारी (ता.१२) येथील पारिजात थिएटर्स आयोजित प्रा. वसंत कानेटकर लिखित ''अश्रूंची झाली फुले'' हे तीन अंकी सामाजिक नाटक सादर होणार आहे. या नाटकाचे निर्माता सुधीर भागवत असून दिग्दर्शक शेखर पाडगावकर यांनी केले आहे. नाटकाचे नेपथ्य आणि ध्वनी संकलन पारिजात रंगमंचचे प्रो. प्रा. अमोल आरोसरकर यांनी केले असून पार्श्वसंगीत नवनाथ राऊळ यांनी दिले आहे. नाटकाची रंगभूषा विजय निगुडकर तर प्रकाश योजना सुरेश सातार्डेकर यांनी केली आहे. या सामाजिक तीन अंकी नाटकात सुधीर भागवत, जगन्नाथ राणे, प्रफुल्ल मांजरेकर, निलेश चव्हाण, सुभाष देवळी, सुधीर राऊळ, विजय गावकर, मनोहर तेली, उत्तम अमरे, मदन शिरोडकर, सिध्दी तळकटकर, सुजाता शेलटकर, शिवप्रसाद पेडणेकर आणि शेखर पाडगावकर आदी कलाकार भुमिका साकारणार आहेत. या तीन अंकी सामाजिक नाटकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पारिजात थिएटर्सच्यावतीने केले आहे.
--
‘एनएमएमएस’मध्ये कासार्डे विद्यालयाचे यश
कणकवली ः राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या एनएमएमएस परीक्षेत कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या आठवीतील वैदेही राणे व वेदिका तेली या विद्यार्थिनींनी यश संपादन करीत शिष्यवृत्ती प्राप्त केली. या विद्यार्थिनींना विद्यालयाच्या एनएमएमएस शिष्यवृत्ती विभागप्रमुख डी. डी. मिठबावकर, एस. डी. भोसले, आर. एस. खटावकर व पी. वाय. सुतार या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल विद्यार्थिनींचे स्थानिक व्यवस्था समिती कार्याध्यक्ष संजय पाताडे, शिक्षण समिती चेअरमन अरविंद कुडतरकर, माजी कार्याध्यक्ष तथा स्थानिक व्यवस्था समितीचे पदाधिकारी प्रभाकर कुडतडकर, प्राचार्य एम. डी. खाडये, पर्यवेक्षक एन. सी. कुचेकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT