कोकण

इंग्रजी चरित्राचे 28 ला प्रकाशन

CD

पान ५ साठी


चरित्रकार कीर यांच्या
चरित्राचे २८ ला प्रकाशन
रत्नागिरी, ता. ११ ः पद्मभूषण डॉ. धनंजय कीर यांच्या इंग्रजी आणि मराठी भाषांतील चरित्रांचे २८ मे रोजी प्रकाशन होत आहे. राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी लिहिलेले मराठी कीर चरित्र २०११ ला प्रसिद्ध झाले होते. आता त्याची सुधारून वाढवलेली आवृत्ती तयार झाली आहे. मसुरकर यांनीच त्यांचे इंग्रजी चरित्र लिहून पूर्ण केले आहे. हे चरित्र मूळ मराठी चरित्राचे भाषांतर नसून पूर्णतः स्वतंत्रपणे केलेले लेखन आहे.
स्वा. सावरकर यांच्या इंग्रजी चरित्रापासून प्रारंभ करून रत्नागिरी शहराचे सुपुत्र धनंजय कीर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, महात्मा गांधी आणि लोकहितकर्ते बाबासाहेब बोले यांची इंग्रजी व मराठी चरित्रे लिहिली. १९५० ते १९७८ या काळात लिहिल्या गेलेल्या या चरित्रांना आजही मागणी असते आणि बोले चरित्राखेरीज अन्य चरित्रांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. लोकमान्य टिळक चरित्राचे राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी केलेले भाषांतर २०१४ मध्ये प्रकाशित झाले. भक्कम पुराव्यांवर आधारित माहितीने परिपूर्ण असल्याने धनंजय कीरांनी लिहिलेली चरित्रे इतिहास आणि व्यक्तिचरित्रांच्या संशोधन कार्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि विश्वासार्ह मानली जातात. चरित्रलेखन कसे करावे याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून चरित्र लिहिण्याच्या धनंजय कीर यांच्या पद्धतीने प्रभावित होऊन आपण १९९६ मध्ये त्यांच्या चरित्राचे लेखन करण्याचे ठरवले, असे मसुरकर यांनी सांगितले. त्यांच्या जीवनाचा आणि विशेषतः त्यांच्या चरित्रांचा सखोल अभ्यास करून त्यांनी लिहिलेले मराठी चरित्र २८ मे २०११ ला प्रकाशित झाले. त्याच्या २१६ प्रती शासनाने खरेदी केल्या आणि वाचकांनीही उत्तम प्रतिसाद दिला. जवळजवळ सर्व प्रती दोनच वर्षांत संपल्या. उरलेली एकच प्रत जोशी या गुजरातमध्ये वास्तव्य करणाऱ्या मूळ मराठी मनुष्याने खरेदी केली. गेली अनेक वर्षे या पुस्तकाबद्दल मागणी होती. शंभर पानांचे इंग्रजी चरित्र सर्वस्वी निराळे असून त्यात १३ प्रकरणे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT