कोकण

20 मे रोजी राजापुरात शॉर्टफिल्म व डॉक्युमेंटरी मेकिंग कार्यशाळा

CD

१३ (टुडे पान ३ साठी)

शॉर्टफिल्म, डॉक्युमेंटरीवर कार्यशाळा

राजापुरात २०, २१ ला आयोजन ; तंत्रज्ञानाची माहिती देणार


रत्नागिरी, ता. १२ ः राजापूर तालुक्यातील स्वरांजली ग्रुप व नगर वाचनालय राजापूर आणि जिज्ञासा रत्नागिरी प्रस्तूत २० व २१ मे रोजी कालवधीत सायंकाळी चार ते साडेसहा या वेळेत राजापूर येथील वाचनालय सभागृहात लघुपट, माहितपट आणि जाहिरातपट शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा मोफत असल्याने प्रथम नावनोंदणी करणाऱ्या फक्त २१ शिबिरार्थींना प्रवेश देण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक, अभिनेता, तंत्रज्ञ व राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुहास भोळे शॉर्टफिल्म (लघुपट), डॉक्युमेंटरी (माहितीपट), अॅडव्हर्टाइज फिल्म (जाहिरातपट) कसे बनवावे? त्यासाठी काय काय तयारी करावी लागते? स्क्रीन प्ले, स्टोरी बोर्ड, संकलन, कॅमेरा याचा वापर कसा करावा, यावर मार्गदर्शन करणार आहेत. आजचं जग माहितीचे वेगवान आदानप्रदान करणारे डिजिटल युग आहे. डिजिटलायझेशन आजच्या काळाचे वैशिष्ट्य आहे. त्यासाठी अत्यंत सोपं असं तंत्रज्ञान आता आपल्या हातात उपलब्ध झालं आहे. पूर्वी कॅमेरा, फिल्म, व्हिडिओ कॅमेरा ही विशिष्ट लोकांची मक्तेदारी होती; मात्र आता डिजिटल क्रांतीने सर्व काही सोपे झाले आहे. विविध माध्यमातून लघुपट कसे बनवायचे, डॉक्युमेंटरी कशी तयार करायची, रेकॉर्डिंग कसे करायचे, एडिटिंग कसे करायचे या संबंधी प्राथमिक कौशल्ये सांगणारी ही एक मोफत विशेष कार्यशाळा होणार आहे. अधिक माहितीसाठी प्रफुल्ल दिवटे, श्रावणी शिवलकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drunk Driving Accident: कल्याणीनगरच्या आपघात प्रकरणी थातूरमातूर कारवाई? पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Iran President Helicopter Crash : इब्राहिम रईस यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत खामेनींच्या मुलाचा हात? इराणमध्ये सत्तासंघर्ष पेटणार, जाणून घ्या सविस्तर

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

SCROLL FOR NEXT