कोकण

ः20 हजाराचे डिझेल पुरवताना कसरत

CD

३३ (पान ३ साठी)

-rat१२p२९.jpg ः
२३M०२४०९
राजापूर ः कोदवली धरणातील गाळ उपसा.
----

२० हजाराचे इंधन पुरवताना कसरत

राजापूर पालिका ; सायबाच्या धरणातील गाळ उपसा

राजापूर, ता. १२ ः कोदवली येथील ब्रिटिशकालिन सायबाच्या धरणातील गाळ उपसण्याचे काम महसूल विभाग, नगर पालिका आणि नाम फाउंडेशन यांचा पुढाकार आणि लोहकसहभागातून हाती घेण्यात आले आहे. या ठिकाणच्या गाळ उपशासाठी नाम फाउंडेशनने एक मशिन पुरवली आहे. मात्र, त्या मशिनला प्रतिदिन लागणाऱ्‍या सुमारे २० हजार रुपयांच्या डिझेलची दररोज व्यवस्था करताना नगर पालिकेला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
शहराला पाणीपुरवठा करणारे कोदवली धरण जीर्ण झाल्याने शासनाने जुन्या धरणालगत सुमारे १० कोटी रुपये खर्चाच्या नव्या धरणाचा प्रस्ताव मंजूर केला होता. नव्या धरणाचे काम सुरू असून सद्यःस्थितीमध्ये अतिरिक्त आर्थिक निधीच्या गरजेमुळे हे काम सध्या अर्धवट स्थितीमध्ये आहे. त्याच्या जोडीला सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे धरणपात्रात वर्षानुवर्षे साचलेला गाळ उपसा करण्यासाठी मात्र कोणतीही निधीची तरतूद केलेली नाही. लोकसहभागातून जो निधी गोळा झाला होता त्यातील काही भाग धरणातील गाळ उपशासाठी डिझेलचा खर्च करण्यासाठी केला जात होता.
हा निधी संपुष्टात आल्याने धरणातील गाळाचे भवितव्य अधांतरी बनले आहे. नाम फाउंडेशनने काही दिवसांसाठी डंपरची व्यवस्था केल्यास कोदवली धरणही बहुतांशी गाळमुक्त होण्याची शक्यता आहे. डिझलेअभावी नाम फाउंडेशनने मोफत पुरवलेले डंपर मागे परतले आहेत. नाम फाउंडेशनचीच एक मशिन सध्या कोदवली धरणातील गाळ उपसा करत आहे; मात्र कोदवली धरणातील गाळ उपशासाठी व वाहून नेण्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद नसल्याने गाळ उपशाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT