कोकण

बिजलीनगर येथे एकाचा आकस्मिक मृत्यू

CD

बिजलीनगर येथे एकाचा आकस्मिक मृत्यू
कणकवली : शहरातील बिजलीनगर येथील महादेव देवू सोगम (वय ६२) यांचे आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास आकस्मिक मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद त्यांचा मुलगा मंदार सोगम (वय ३५) याने आज कणकवली पोलिस ठाण्यात दिली. फिर्यादीत म्हटले आहे की, दुपारी दोनच्या सुमारास जेवण आटोपून महादेव सोगम हे घरी झोपले होते. सायंकाळी चारच्या सुमारास महादेव यांची पत्‍नी माधवी चहा घेऊन आल्‍या असता, त्‍यांना महादेव यांच्याकडून कोणतीही हालचाल दिसली नाही. त्‍यामुळे त्‍यांना तातडीने खासगी रूग्‍णालयात दाखल करण्यात आले. यात डॉ. चंद्रकांत राणे यांनी रूग्‍णास ऑक्‍सिजनची आवश्‍यकता असल्‍याने उपजिल्‍हा रूग्‍णालयात जाण्याचा सल्‍ला दिला. तर उपजिल्‍हा रूग्‍णालयात दाखल केल्‍यानंतर महादेव यांचा मृत्‍यू झाल्‍याची माहिती तेथील डॉक्‍टरांनी दिली.
-------------------
उपचारासाठी नेताना तरूणाचा मृत्‍यू
कणकवली : भुईबावडा येथून कणकवलीतील खासगी रूग्‍णालयात उपचारासाठी येणाऱ्या तरूणाचा आज मृत्‍यू झाला. राजेश शंकर पाटणकर (वय ३६, रा. भुईबावडा-बाजारपेठ), असे त्‍याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद हेमंत काशीनाथ तोरसकर (वय ४९, नाद तळेवाडी) यांनी आज येथील पोलिस ठाण्यात दिली. राजेश शंकर पाटणकर यांना दुपारी दोनच्या सुमारास छातीत दुखू लागले. त्‍यांना उपचारासाठी नाधवडे येथील डॉ.कोळी यांच्याकडे दाखल केले होते. तेथे प्राथमिक उपचारानंतर राजेश पाटणकर यांना कणकवलीतील डॉ. रेवडेकर हॉस्पिटल येथे अधिक उपचारासाठी रिक्षातून आणले जात होते. दुपारी तीनला डॉ. रेवडेकर यांनी दवाखान्याबाहेर आलेल्‍या रिक्षामध्येच राजेश पाटणकर यांची तपासणी केली. यात ते मृत झाल्‍याचे त्‍यांनी सांगितले. पाटणकर यांच्या मृत्‍यूची चौकशी होण्याबाबतची फिर्याद हेमंत तोरसकर यांनी दिली आहे.
---------------
बिडवाडीत प्रौढाचा आकस्मिक मृत्‍यू
कणकवली : बिडवाडी कणखरेवाडी (ता.कणकवली) येथील भालचंद्र यशवंत राणे (वय ६०) यांचा आज आकस्मिक मृत्‍यू झाला. याबाबतची खबर सुहास वामन राणे (वय ५६, रा.बिडवाडी) यांनी दिली. त्‍यात नमूद केल्‍यानुसार भालचंद्र राणे यांना दारूचे व्यसन होते. ते बिडवाडी बौद्धवाडी येथील बस थांब्याच्या बाजूला गटारात मृतावस्थेत आढळून आले. सायंकाळी चारच्या सुमारास हा प्रकार उघड झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अमित शहा यांचा ए़िडिटेड व्हिडिओ शेअर केल्याच्या आरोपावरून काँग्रेस आमदाराच्या 'पीए'ला अटक

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT