कोकण

हर्णै समुद्रदर्शन पॉईंट धोकादायक

CD

१६ (पान ५ साठी)


-rat१३p१३.jpg ः
२३M०२५५९
हर्णै ः समुद्रदर्शन पॉईंटवरील लोखंडी रेलिंग चोरीला गेल्याने धोकादायक ठरत असलेला हा पॉईंट.
-----
हर्णैमधील समुद्रदर्शन पॉईंट धोकादायक

लोखंडी रेलिंग चोरीला ; पर्यटकांच्या पसंतीचा स्थान

दाभोळ, ता. १३ ः कोकणातील दापोली तालुक्याला स्वच्छ, सुंदर समुद्र किनारपट्टीसह निसर्गसृष्टी सौंदर्याचे अगदी भरभरून वरदान लाभले आहे. त्यामुळे दापोलीत पर्यटकांचे येण्याचे प्रमाण वाढले आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने हर्णै-आंजर्ले बायपास मार्गावर २ ठिकाणी समुद्रदर्शनासाठी पॉईंट तयार केले होते; मात्र तेथील लोखंडी पाईप चोरीला गेल्याने हे पॉईंट धोकादायक ठरत आहेत.
दापोली तालुक्यात हर्णै बायपास मार्गावरून प्रवास करणाऱ्या पर्यटकांना अगदी सहज समुद्रदर्शन होईल यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने २० वर्षापूर्वी २ ठिकाणी समुद्रदर्शनासाठी व सूर्यास्त पाहण्यासाठी पॉईंट उभारले होते. यातील पाजपंढरी गावाच्या माथ्यावरील हर्णै बायपास मार्गावरील अडखळ हद्दीत असलेला सनसेट पॉईंट हा पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीस उतरलेला पॉईंट आहे. या पॉईंटवरून सूर्य मावळतीला जातानाचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी थांबतात. याच ठिकाणाहून हर्णै समुद्रातील सुवर्णदुर्ग किल्ला, पाजपंढरी गावातील समुद्रकिनाऱ्याजवळ असलेली घरे, समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा, आंजर्ले येथील कड्यावरचे गणपती मंदिर अथवा नारळी पोफळींच्या बागा हे पाहण्यासाठी पर्यटक येथे थांबतातच; मात्र या पॉईंटवरून कोणी खाली पडू नये यासाठी लोखंडी पाईपचे रेलिंग बसवले होते. काही समाजकंटकांनी ते कापून त्याची भंगारात विक्री केली आहे. रेलिंग नसल्याने हा भाग धोकादायक झाला असून, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी पुन्हा रेलिंग बसवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: फाफ डू प्लेसिसचा भन्नाट कॅच अन् धोनीला 16 व्या ओव्हरलाच उतरावं लागलं मैदानात

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT