२३ (पान २ साठी)
-rat१३p१६.jpg-
२३M०२५७२
रत्नागिरी ः सेवा सामाजिक विकाससंस्थेत परिचारिक दिन कार्यक्रमात बोलताना विद्यार्थी. सोबत परिचारिका, शिक्षक.
----
सेवा सामाजिक संस्थेत परिचारिका दिन
रत्नागिरी, ता. १३ ः येथील सेवा सामाजिक विकाससंस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कोकण नगर प्राथमिक आरोग्यकेंद्रातील जान्हवी रांबाडे व भस्मे उपस्थित होत्या. परिचारिका दिनाचे औचित्य साधून येथे सुरू झालेल्या ३ महिन्याच्या बेडसाईड असिस्टंट प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले.
परिचारकांची सामूहिक प्रतिज्ञा म्हणण्यात आली. संस्थेतील शिक्षक प्रशांत ठाकूर यांनी प्रस्तावना केली. सेवा सामाजिक विकाससंस्थेत सध्या चालू असलेले नर्सिंग प्रशिक्षण हे एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः मोफत आहे. ९ हजार रु. विद्यावेतनदेखील मिळत आहे. एससी प्रवर्गातील १८ ते ४५ वयोगटातील होतकरू तरुण- तरुणींसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. जास्तीत जास्त एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष युवराज भांडवलकर यांनी केले. प्रणय मोहिते, वेदांत मोहिते, प्रतीक्षा कांबळे, सोनाली चव्हाण, मानसी पवार आदी विद्यार्थ्यांनी परिचारिका दिनाचा इतिहास व कोरोना काळातील परिचारिकांचे कार्य याबद्दल मनोगत व्यक्त केले. पौर्णिमा कांबळे व प्रज्ञा सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.