कोकण

लांजातील गांजा प्रकरणाचे धागेदोरे चिपळूणपर्यंत

CD

पान १
लांजातील गांजा प्रकरणाचे धागेदोरे चिपळूणपर्यंत
दोन तरुणांना अटक; कुठून कसा आणला याची चौकशी
लांजा, ता. १४ ः लांजातील गांजा प्रकरणाचे धागेदोरे आता चिपळूणपर्यंत पोहोचले असून लांजा येथील गांजा प्रकरणी पोलिसांनी चिपळूण येथील आणखी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
लांजा शहरात गेल्या काही महिन्यांपासून गांजासारख्या अमली पदार्थांचा विळखा हा तरुणाईच्या गळ्याभोवती फास घालू लागला आहे. शुक्रवारी (ता. १२) रात्री ७.५० वाजण्याचा दरम्यान लांजा शहरात चिंतामणी हॉस्पिटलच्या पाठीमागे असलेल्या चिरेबंदी कंपाउंडच्या जागेत गांजाचे सेवन करणाऱ्या चौघा स्थानिकांच्या मुसक्या आवळल्या होत्या. तसेच त्यांच्याकडून २६.०९ ग्रॅम वजनाचा गांजादेखील जप्त केला होता.
ताब्यात घेण्यात आलेल्या चौघा स्थानिक तरुणांची कसून चौकशी करण्यात आल्यानंतर त्यांनी हा गांजा चिपळूण येथून खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी चिपळूण येथील राकेश भगवान गोरिले (वय ३१) आणि सचिन जयवंत चव्हाण (३२) यांना शनिवारी अटक केली आहे. हा गांजा कुठून आणि कसा आणला याबाबत पोलिस त्यांच्याकडून तपास करत आहेत. त्या दोघांना रविवारी १४ मे रोजी राजापूर येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने दोन दिवसांची म्हणजे सोमवारी १५ मे पर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.
याबाबत लांजा पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांनी सांगितले की, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार धडक कारवाई सुरू आहे. शहर आणि तालुक्याचे ठिकाणी अशा प्रकारचे अमली पदार्थाचे अड्डे आहेत ते पूर्णपणे उद्‌ध्वस्त केले जाणार आहेत. लांजा शहर तसेच तालुक्यात अशा प्रकारे काही संशयास्पदरित्या आढळून आल्यास संबंधित नागरिकांनी लांजा पोलिस ठाणे ०२३५१-२३००३३ किंवा मोबाईल ९९६७९११३०८१ यावर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन घुटुकडे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT