कोकण

अपेक्षा, आरतीसह पंकज चवंडे यांचा आदर्श घ्या

CD

२७ (पान ५ साठी)

- rat१८p२५.jpg-
23M03627
रत्नागिरी ः शिवछत्रपती पुरस्कारासाठी नामांकनप्राप्त खो-खो पटूंसह त्यांच्या मार्गदर्शकांचा सन्मान करताना पालकमंत्री उदय सामंत. पहिल्या छायाचित्रात अपेक्षा सुतार, दुसऱ्या छायाचित्रात आरती कांबळे, तिसऱ्या छायाचित्रात प्रियांका भोपी, मार्गदर्शक पंकज चवंडे, राज्याचे माजी सचिव संदीप तावडे.
-----------

अपेक्षा, आरतीसह चवंडे यांचा आदर्श घ्या

पालकमंत्री उदय सामंत ; खो-खोतील यशाबद्दल सन्मान

रत्नागिरी, ता. १८ ः छत्रपती पुरस्कार मिळवणारे खेळाडू आणि त्यांना घडवणारे मार्गदर्शक रत्नागिरी जिल्ह्यात आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे. शिक्षकांनी राष्ट्रीय मार्गदर्शक पंकज चवंडे यांचा तर विद्यार्थ्यांनी अपेक्षा सुतार आणि आरती कांबळेचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या शामराव पेजे सभागृहात आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरवातीलाच महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेचे माजी सचिव संदिप तावडे, राष्ट्रीय मार्गदर्शक पंकज चवंडे, शिवछत्रपती पुरस्काराच्या यादीत असलेल्या अपेक्षा सुतार, आरती कांबळे, ठाण्याची खो-खोपटू प्रियांका भोपी या खेळाडूंचा पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यानंतर मंत्री सामंत म्हणाले, नासा, इस्त्रोला जाणाऱ्‍या विद्यार्थ्यांच्या सत्कारापुर्वी क्रीडाक्षेत्रातील पाच जणांचे सत्कार जाणीवपूर्वक केले आहेत. महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेचे माजी सचिव संदीप तावडे हे मैदानावर मार्गदर्शकाच्या भूमिकेत गेली अनेक वर्षे काम करत आहेत. प्रत्यक्ष मैदानावर राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे मुलांना घडवत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज शिवछत्रपती पुरस्काराच्या यादीत अपेक्षा सुतार, आरती कांबळे या खेळाडू आहेत. त्यांचा आदर्श भविष्यात सर्वांनी घेतला पाहिजे. हा पुरस्कार का मिळतो हे शाळांमधील प्रत्येक शिक्षकांने विद्यार्थ्यांना सांगायची आज गरज आहे. दोन मुलींबरोबरच प्रशिक्षक पंकज चंवडे यांनाही पुरस्कार जाहीर झाला पाहीजे होता. या खेळाडूंना घडवण्यासाठीचा हा सन्मान पुरस्काराप्रमाणेच आहे. सर्व शिक्षकांनी पंकजचा आदर्श तर विद्यार्थ्यांनी अपेक्षा, आरतीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा.
----


राजकारणासाठी अनेक दरवाजे
शैक्षणिक उपक्रमात राजकारण करू नये. त्यासाठी अनेक दरवाजे आहेत. पुढील पिढी घडवायची असेल तर सर्वांनी एकत्र आले पाहिजे. जोपर्यंत आधुनिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत मिळत नाही, तोपर्यंत खासगी शाळांकडील ओघ वाढणार नाही. ही जबाबदारी शिक्षकांची आहे असे सामंत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

CSK Playoffs Scenario : CSKवर टांगती तलवार... प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी उरला एकच रस्ता; अन्यथा टॉप-4 मधून पत्ता कट

Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष

SCROLL FOR NEXT