कोकण

गणपतीपुळे किनार्‍यावर मृत डॉल्फिन मासा

CD

४५ (पान ३ साठी)


- rat१९p४०.jpg-
२३M०३८४१
गणपतीपुळे ः किनाऱ्यावर सापडलेला मृत डॉल्फिन मासा (छाया ः किसन जाधव, गणपतीपुळे)
---------------

गणपतीपुळे किनाऱ्यावर मृत डॉल्फिन मासा

रत्नागिरी, ता. १९ ः येथील गणपतीपुळे किनाऱ्‍यावर आज दुपारी मृत डॉल्फिन मासा आढळून आला. हा मासा पाहण्यासाठी पर्यटकांनी केली गर्दी होती. माशाचा दुर्गंधीने पर्यटकांना त्रास होऊ नये यासाठी जीवरक्षकांनी किनाऱ्‍यावर खड्डा खोदून पुरून टाकण्यात आला.
गणपतीपुळे मंदिरासमोर दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास मृत डॉल्फिन मासा समुद्राच्या लाटांबरोबर किनऱ्‍यावर वाहत आला. सुरवातीला तो जीवंत असल्याचे पर्यटकांना वाटले; पण मासा पाहिल्यानंतर तो मृत असल्याची खात्री झाली. त्याला गादा मासा असेही म्हटले जाते. किनऱ्‍यावर फिरायला आलेल्या पर्यटकांसह व्यापाऱ्यांनी गर्दी केली होती. माशाच्या शेपटीजवळ जखम झाल्यामुळे त्याला अपघात झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याच्या शरीरावरील कातडीही निघून गेली होती. कदाचित त्याचा मृत्यू होऊन बराच कालावधी झाला असावा. समुद्राच्या खऱ्‍या पाण्यात असल्यामुळे माशाचा भाग कुजलेला नसला तरीही थोडी दुर्गंधी येत होती. हा मासा जास्त काळ किनाऱ्‍यावर राहिला असता तर पर्यटकांना दुर्गंधीचा सामना करावा लागला असता. त्यामुळे किनाऱ्‍यांवरील लोकांनी तो किनऱ्‍यावर वाळूमध्ये खड्डा खोदून पुरला. दरम्यान, डॉल्फिन माशाचा रत्नागिरी, गुहागर आणि दापोलीतील किनारी भागात वास्तव्य आहे. अनेक पर्यटक माशांना पाहण्यासाठी समुद्रात सकाळी गर्दी करत असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT