कोकण

कुडाळमध्ये उद्या ओबीसी समाज बैठक

CD

03888
कुडाळ : येथे पत्रकार परिषदेत बोलताना सुनील भोईटे. शेजारी आनंद मेस्त्री, काका कुडाळकर, डॉ. कारंडे, नंदन वेंगुर्लेकर आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)

कुडाळमध्ये उद्या ओबीसी समाज बैठक

पत्रकार परिषदेत माहिती; उपस्थितीत राहण्याचे आवाहन

कुडाळ, ता. २० ः सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी समाज आता एकवटत आहे. त्या दृष्टीने ओबीसी समाजाची महत्वाची बैठक सोमवारी (ता.२२) सायंकाळी ३ वाजता कुडाळमध्ये होणार आहे. जिल्हयातल्या ओबीसी समाजामध्ये ज्या जाती येतात, त्यांचे प्रतिनिधी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यासाठी राष्ट्रीय ओबीसी ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा ओबीसी महासंघाचे सुनील भोगटे, काका कुडाळकर आणि नंदन वेंगुर्लेकर यांनी दिली.
ओबीसी समाज आणि आरक्षित समाज बांधवांची आज एमआयडीसी येथे पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ओबीसी समाज जिल्हाध्यक्ष आनंद मेस्त्री, वैश्य समाज अध्यक्ष सुनील भोगटे, दैवज्ञ समाज प्रतिनिधी हेमंत उर्फ काका कुडाळकर, चर्मकार समाज प्रतिनिधी नंदन वेंगुर्लेकर, गाबीत समाज प्रतिनिधी चंद्रशेखर उपरकर, राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. शांताराम कारंडे, नाभिक समाज प्रतिनिधी जगदीश चव्हाण, बौद्ध समाज प्रतिनिधी महेश परुळेकर, नाभिक समाज युवा अध्यक्ष रुपेश पिंगुळकर आदी उपस्थित होते.
यावेळी वैश्य समाज जिल्हाध्यक्ष भोगटे म्हणाले, ‘‘ओबीसी समाज एकत्र आणण्याचे काम सुरू आहे. कोरोनामुळे हे काम काही काळ थांबले होते. पण, ५२ टक्के आरक्षणामध्ये येणारा सर्व समाज आता एकजूट होणार आहे. ही एक चळवळ होणार असून यामध्ये सिंधुदुर्गातील ४४ जिल्हाध्यक्षांना सहभागी करून घेतले जाईल. २२ ला कुडाळ येथे ओबीसी समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. तत्पूर्वी दापोली येथे २१ ला ओबीसी समाजातील पदाधिकाऱ्यांचा भव्य मेळावा होणार आहे. या दोन्ही मेळाव्यांना ओबीसी समाज राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. तायवाडे आणि कोकण विभागीय अध्यक्ष प्रा. एकनाथ ताडमाळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.’’ चर्मकार समाजाचे पदाधिकारी वेंगुर्लेकर म्हणाले, ‘‘ओबीसी समाज एकत्रित येणे गरजेचे असून २२ मेच्या मेळाव्यानंतर सिंधुदुर्गात या समाजाचा एल्गार होईल.’’
--
ओबीसींची एकजूट आवश्यक
दैवज्ञ समाज पदाधिकारी कुडाळकर म्हणाले, ‘‘ओबीसी म्हणून आम्ही एकवटले आहोत. जिल्ह्यात ओबीसींची एकत्रित ताकद मोठी असून यासाठी आता चळवळ राबवावी लागेल. ओबीसी आरक्षणाबाबत सरकार किंवा न्यायालय दरबारी आपल्याला न्याय मिळालेला नाही. त्यामुळे ओबीसी समाज दबला गेला. याचा परिणाम आपल्या ओबीसी समाजावर होत आहे. जिल्ह्यातील ओबीसींची एकजूट व्हावी आणि त्यांना न्याय मिळावा म्हणून जिल्ह्यातील सर्व ओबीसी संघटनांनी संलग्न होणे आवश्यक आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT