कोकण

-जिल्हा नियोजनमधून चिपळूणला देणार पाच कोटी

CD

१५ (पान २ साठीमेन)


- ratchl२०१.jpg ः
२३M०३९४९
चिपळूण ः सांस्कृतिक केंद्राच्या नुतनीकरण कामाच्या भूमिपूजनप्रसंगी बोलताना पालकमंत्री उदय सामंत.
--

जिल्हा नियोजनमधून चिपळूणला पाच कोटी

उदय सामंत ; सांस्कृतिक केंद्राच्या नुतनीकरणाचा प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २० ः चिपळूणच्या विकासासाठी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून लागेल तेवढा निधी देऊ. विकासात राजकारण करण्याची गरज नाही. श्रेयवादही आवश्यक नाही. विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करू. चिपळूण शहराच्या इन्‍फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी पुढच्या जिल्हा वार्षिक नियोजनामध्ये ५ कोटी रुपयांचा निधी पालिकेला दिला जाईल. या निधीमधून शहाराचा कायापालट होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
चिपळुणातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र नुतनीकरण कामाच्या भूमिपूजनप्रसंगी शनिवारी (ता. २०) सकाळी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्याच हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन केले. या वेळी माजी आमदार सदानंद चव्हाण, रमेश कदम, सुरेखा खेराडे, प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार प्रवीण लोकरे, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, सचिन कदम, लियाकत शाह, आशिष खातू, सावित्री होमकळस आदी उपस्थित होते.
पालकमंत्री सामंत म्हणाले, गेल्या दोन वर्षापूर्वी चिपळूण शहरात पूर आला होता. परत पूर येऊ नये यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. चिपळूणमधील रेड लाईन, ब्लू लाईन हा महत्वाचा विषय आहे. चिपळूणकरांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक घेण्यात येईल. विकासाची कामे करत असताना सर्वांनी एकत्रित येऊन काम केले पाहिजे. विकास करताना राजकीय मतभेद बाजूला ठेवून पक्षविरहित काम व्हायला हवे. स्व. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या नूतनीकरणासाठी दिलेल्या निधीचा योग्य विनियोग झाला पाहिजे. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या वेळी क्रीडासंकूल, सिंथेटिक कोर्ट बनवणे, नगरपालिका हद्दीतील जि. प. प्रा. शाळा गोवळकोट भोईवाडी नवीन इमारत बांधणे आदी कामांचे भूमिपूजन पालकमंत्र्याच्या हस्ते झाले.
--

उदघाटनाबाबत व्यासपीठावर संभ्रम

इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासदर्भात सामंत म्हणाले, केंद्र केव्हा सुरू होईल हे मुख्याधिकारी सांगत नाही. याचवेळी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी १५ ऑगस्टला सांस्कृतिक केंद्र सुरू होईल असे सांगताच १५ ऑगस्ट कधीची तारीख असे पालकमंत्र्यांनी सांगताच हशा पिकला. या वेळी मुख्याधिकाऱ्यांनी १४ ऑगस्ट २०२३ असे जाहीर करताच आपण रत्नागिरीत ध्वजारोहण केल्यानंतर चिपळुणातील केंद्राचे उद्घाटन करण्यासाठी येऊ. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी हे काम वेळीच मार्गी लावावे लागेल.
-------
सकपाळ नक्की कोणाबरोबर

याप्रसंगी सामंत माजी नगरसेवक उमेश सकपाळ यांना उद्देशून म्हणाले, सकपाळ हे नक्की कोणाबरोबर हेच गणित कळत नाही. खासदार म्हणतात सकपाळ आमचेच तर सचिन कदम म्हणतात आमचे. आज तर सर्वपक्षीय आहेत. मग घोडे अडले कोठे हेच कळत नाही. आम्हाला वाटते ते आमच्याबरोबर आहेत. आज निदान आमच्यापाठी बसले आहेत, अशा मिश्किल शब्दात सकपाळ यांना चिमटा काढला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

SCROLL FOR NEXT