कोकण

शैक्षणिक कामांमुळे शिक्षक नाराज

CD

१५ (टूडे ३ साठी)

शिक्षकांना सुट्टीत शैक्षणिक काम

रत्नागिरी, ता. २२ ः मान्यता तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांची माहिती घेण्याच्या कामात गुंतवण्यात आले आहे. त्यामुळे शैक्षणिक वेळापत्रकानुसार शिक्षकांना देण्यात आलेली मे महिन्याची सुट्टी शैक्षणिक कामात जात असल्याची माहिती यावेळी मिळाली आहे. शिक्षण विभागाच्या या कारभारामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना या समान अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शैक्षणिक वेळापत्रकानुसार एप्रिल महिन्यात परीक्षा संपते आणि मे महिना शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात येते. त्यामुळे मे महिन्यात शिक्षक आपल्या कुटुंबासोबत बाहेर गावी फिरायला जातात. मात्र यंदा सरल पोर्टलवर विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी शिक्षण विभागाकडून आदेश देण्यात आले आहे. त्या माहितीनुसार संच मान्यता तयार करण्यात येणार आहे आणि शाळांना त्या पद्धतीने अनुदान तसेच पद देण्यात येणार आहे. अनेक शाळांनी विद्यार्थ्यांची माहिती भरली नसल्यामुळे शिक्षकांना ही माहिती भरण्यासाठी मे महिनाच्या म्हणजेच सुट्टीच्या दिवशी शाळेत यावे लागत आहे. त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थी गावी गेले असल्यामुळे त्यांची माहिती शोधण्यात शिक्षकांना पूर्ण दिवस द्यावा लागत असल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT