कोकण

सावरकर स्मृती पुरस्कार माझा नसून रत्नागिरीकरांचा

CD

rat22p1.jpg
04233
मुंबई : अॅड. बाबा परुळेकर यांना सावरकर स्मृती पुरस्कार प्रदान करताना राज्यपाल रमेश बैस. सोबत प्रवीण दीक्षित, रणजित सावरकर, मंजिरी मराठे, राजेंद्र वराडकर, स्वप्निल सावरकर आदी.
-----------
सावरकर स्मृती पुरस्कार
माझा नसून रत्नागिरीकरांचा
अॅड. परुळेकर; स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे सन्मान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाचा पुरस्कार वीर सावरकरांच्या पणतूंच्या उपस्थितीत व राज्यपालांच्या हस्ते मिळाला हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा योग व सन्मान आहे. रत्नागिरीत काम करताना सावरकरांच्या स्मृती व कार्य जोपासावे व प्रसार करण्याचे काम मी व सहकारी करत आहोत. त्याची आंतरराष्ट्रीय संस्थेने दखल घेतली ही अभिमानाची गोष्ट आहे. हा पुरस्कार माझा नसून सर्व रत्नागिरीकरांचा आहे, असे प्रतिपादन अॅड. प्रदीप चंद्रकांत तथा बाबासाहेब परुळेकर यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने सावरकरांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी असणारा व्यक्ती वा संस्थेसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीचिन्ह पुरस्कार २०२३ अॅड. बाबा परुळेकर यांना दादरच्या शिवाजी उद्यान येथील सावरकर सभागृहात प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्यानंतर ते बोलत होते.
या वेळी राज्यपाल रमेश बैस म्हणाले, देशाच्या इतिहासात क्रांतिकारक नेत्यांना बदनाम केले गेले, या इतिहासातील अन्यायाला सुधारून सर्व क्रांतिकारकांना योग्य गौरवित करणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे समाजाचे शिल्पकार होते, समाजातील दोष दूर करणारे सुधारक होते, जातिभेदाविरोधात लढणारे योद्धे होते. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात येणे हे तीर्थयात्रेसारखे आहे. २८ मे हा दिवस स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवदिन म्हणून घोषित केला आहे तर त्याच दिवशी दिल्लीत नव्या संसद भवनाच्या वास्तूचे उद्घाटन होणार आहे.
कार्यक्रमाला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित, कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्निल सावरकर उपस्थित होते.

चौकट
पुरस्कार विजेते
या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार मेजर कौस्तुभ प्रकाश राणे (मरणोत्तर) यांना देण्यात आला. हा पुरस्कार त्यांच्या मातोश्री ज्योति प्रकाशकुमार राणे यांनी स्वीकारला. विज्ञान पुरस्कार आय. आय. टी. कानपूरचे संचालक प्रा. अभय करंदीकर यांना, समाजसेवा पुरस्कार नागपूरच्या मैत्री परिवार या संस्थेला प्रदान करण्यात आला. संस्थेच्या प्राचार्य माधुरी यावलकर आणि प्रा. प्रमोद पेंडके यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: "पंतप्रधान मोदी मंगळसूत्र आणि बांगड्यांबद्दल बोलतात, मात्र ऑलिम्पिकपटूंचा लैंगिक छळ होताना ते गप्प असतात," प्रियंकांचा हल्लाबोल

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Rajesh Joshi : नागपूरचे राजेश जोशी आशिया बुकमध्ये; केली सर्वात छोट्या व हलक्या विमानाची निर्मिती

खासदार रेवण्णांची धजदमधून हकालपट्टी होणार?ऐन निवडणुकीत माजी पंतप्रधानांच्या नातवावर अटकेची टांगती तलवार

SCROLL FOR NEXT