कोकण

वाळूच्या चार डंपरवर सातार्ड्यात कारवाई

CD

वाळूच्या चार डंपरवर
सातार्ड्यात कारवाई
सावंतवाडी, ता. २३ ः पास न घेता गोव्याच्या दिशेने चोरटी वाळू वाहतूक केल्याप्रकरणी येथील पोलिसांनी आज चार डंपरवर कारवाई केली. यात ४० हजारांच्या वाळूसह तब्बल ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई आज सकाळी सातार्डा दूरक्षेत्रावर झाली. याबाबतची माहिती पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुडाळहून गोव्याच्या दिशेने चार डंपर चोरटी वाळू वाहतूक करीत असल्याची माहिती एका अज्ञात व्यक्तीकडून पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी सातार्डा पोलिस दूरक्षेत्रावर सापळा रचला. यावेळी ते चारही डंपर संशयास्पद येताना दिसले. यावेळी ते डंपर थांबवून पासची मागणी केली असता त्यांच्याकडे कोणतेही पास आढळून आले नाहीत. त्यामुळे चारही डंपरसह वाळू जप्त करण्यात आली. संबंधित चालक व मालकांवर गुन्हा दाखल करून थेट न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक मेंगडे यांनी सांगितले.
..............
‘शिक्षकप्रश्नी आज सीईओंची भेट’
सिंधुदुर्गनगरी, ता. २३ ः जिल्ह्यातील १२१ प्राथमिक शाळांमध्ये एकही शिक्षक नाही. याबाबत आमदार वैभव नाईक, सतीश सावंत उद्या (ता २४) रोजी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची भेट घेणार आहेत. आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत शिक्षक बदली धोरणामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२१ शाळांमध्ये जूनपासून एकही शिक्षक उपलब्ध असणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. हा गंभीर प्रश्न असून याबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक व शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत हे बुधवारी (ता.२४) सकाळी अकराला ओरोस येथे जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांची भेट घेणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT