कोकण

-राजापूर अर्बनच्या श्रृंगारतळी शाखेचे थाटात उदघाटन

CD

१२ (पान २ साठी)

-rat२६p९.jpg ः
२३M०५१२०
राजापूर ः बोलताना बँकेचे उपाध्यक्ष प्रसाद मोहरकर. या वेळी उपस्थित विजय तेलगडे, मोहन संसारे, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे आदी.
------------------

राजापूर अर्बनच्या श्रृंगारतळी शाखेचे उदघाटन

राजापूर, ता. २६ ः ग्राहकांची पुंजी सुरक्षित ठेवणे व सर्वसामान्यांची आर्थिक गरज पूर्ण करणारी, व्यापारी, उद्योजक ते सर्वसामान्यांची बँक म्हणून आज राजापूर अर्बन को-ऑप बँकेकडे पाहिले जात आहे. आपणा सर्वांच्या सहकार्यामुळे आपण शृंगारतळी शाखा सुरू करत आहोत. आपला पाठिंबा व साथ हवी आहे, असे प्रतिपादन राजापूर अर्बन को-ऑप बँकेचे उपाध्यक्ष प्रसाद मोहरकर यांनी केले. दरम्यान, पहिल्या दिवशी १ कोटी रुपयांच्या ठेवी आणि शंभर खातेदार करत बँकेने लक्षवेधी कामगिरी केली.
राजापूर अर्बन बँकेच्या गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील १२व्या शाखेचा नुकताच आरंभ झाला. या वेळी बँकेचे उपाध्यक्ष प्रसाद मोहरकर, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे, पाटपन्हाळेच्या सरपंच विजय तेलगडे, शृंगारतळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मोहन संसारे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे, व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष अनिलकुमार करंगुटकर, रवींद्र ठाकूरदेसाई, संचालकवृंद, शाखाधिकारी आरिफ कर्णेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
श्री. मोहरकर म्हणाले, ’कोकणात सहकार रूजण्यास उशीर झाला असला तरी जोमाने वाढत आहे. विश्वासार्हता, पारदर्शकता आणि प्रामणिकपणा जपलेली व ग्राहकांच्या अडीअडचणीच्या वेळेस सहकाराचा उद्देश खऱ्या अर्थाने साध्य करणारी अशी आपली राजापूर अर्बन को-ऑप बँक आहे. अत्याधुनिक सेवासुविधा देऊन आपली बँक भविष्यामध्ये प्रगतीची नवनवीन शिखरे पार करणार असून त्यासाठी आपली साथ आणि पाठिंबा निश्‍चितच मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघन केल्याची तक्रार

SCROLL FOR NEXT