कोकण

रातांबेवाडीत पाण्यासाठी वणवण; टॅंकर मागणीकडे दुर्लक्ष

CD

३४ (पान २ साठीमेन)

-rat२६p२४.jpg ः
२३M०५१६७
रातांबेवाडी (ता. मंडणगड) ः पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोताची पातळी घटल्याने पाणी दूषित झाले असून ग्रामस्थांना कसरत करून पाणी काढावे लागत आहे.
-------------

टंचाईग्रस्त गावांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

रातांबेवाडीत पाण्यासाठी वणवण ; टॅंकरच्या मागणीकडे महिनाभर दुर्लक्षच, आंदोलनाची तयारी
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २६ ः तालुक्यातील रातांबेवाडी गावात प्रचंड पाणीटंचाई झाली असून पाण्यासाठी गावकऱ्यांची वणवण सुरू आहे. एप्रिल महिन्यात केलेल्या टॅंकर मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थ व महिला आता आंदोलनाच्या भूमिकेत असल्याचे चित्र आहे.
टंचाईकाळाच टँकरमुक्त तालुक्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मे महिन्यात पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसत असलेल्या तालुक्यातील गावांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याची गंभीर बाब मे च्या शेवटच्या आठवड्यात अधोरेखित झाली आहे.
प्रशासनाने तयार केलेला टंचाई कृती आरखडा हा समस्येची व्याप्ती लक्षात घेऊन न केल्याने नियोजनात नसलेल्या गावातूनही पाणीटंचाईमुळे ग्रामस्थ त्रस्त झाल्याची समस्या पुढे येत आहेत. रातांबेवाडी येथील वाडीतील ग्रामस्थ दरवर्षी स्वत:च्या पाणी समस्येवर स्वत: उत्तर शोधत आहेत. सुमारे १०० घरांचा उंबरठा असलेल्या या वाडीने ग्रॅव्हिटीने दूरवरून आपल्या वाडीवर पाणी आणून टंचाईच्या काळातील आपल्या समस्येवर उत्तर शोधले होते; मात्र यंदा उद्भवातच पाणीसाठा पूर्णतः खालावल्याने एप्रिल महिन्यात सरपंच घोसाळे यांनी पाणीटंचाईच्या समस्या लक्षात घेऊन १७ एप्रिललाच रातांबेवाडी या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली होती; मात्र या मागणीकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष करत अद्याप त्याची पूर्तता केलेली नाही. परिणामी, पाण्यासाठी वणवण करणाऱ्या ग्रामस्थ व महिलांनी आंदोलनाचा निर्णय घेत असल्याचे सांगितले.
-----------
कोट
गावाला पाणीटंचाईची समस्या गंभीर आहे. मागणी करूनही टॅंकर पुरवला जात नाही. त्यामुळे आता नाइलाजास्तव आम्हाला पाण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे. प्रशासन दुर्लक्ष करत असून, गावकरी पाण्यासाठी वणवण करत आहेत. तरीही पाण्याबाबत संवेदनशील प्रशासन दिसत नाही.
- प्रकाश भुवड, माजी सरपंच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

SCROLL FOR NEXT