कोकण

अणावच्या सावंत कुटुंबाकडून ‘१०० इडियट’ ग्रुपचे आभार

CD

05634
मालवण ः सावंत कुटुंबीयांनी ‘१०० इडियट’ ग्रुपचे आभार मानले.

अणावच्या सावंत कुटुंबाकडून
‘१०० इडियट’ ग्रुपचे आभार
मालवण : अणाव-हुमरमाळा (ता. कुडाळ) येथील मानस सावंत या लहान मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी मोठ्या रकमेची आवश्यकता होती. सर्वसामान्य परिस्थितीतील त्या कुटुंबाला वर्षभरापूर्वी येथील सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या ‘१०० इडियट ग्रुप’ने लाखमोलाचा मदतीचा हात दिला. आणखीही दानशूर व्यक्तींच्या मदतीतून मुलाची शस्त्रक्रिया व उपचार यशस्वीपणे पार पडले. सावंत कुटुंबीयांनी मुलासह मालवण पिंपळपार येथे दाखल होत ग्रुप अ‍ॅडमिन व सदस्यांचे आभार मानले. मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी काही लाख रुपये रक्कम आवश्यक होती. याबाबत माहिती मिळताच नेहमीच मदतकार्यात पुढाकार घेणाऱ्या १०० इडियट ग्रुप सदस्यांनी एकत्रित केलेली रक्कम मार्च २०२२ ला डॉ. शिल्पा झांटये, डॉ. मालविका झांटये, नेहा कोळंबकर, माधुरी मेस्त्री व ग्रुप सदस्यांच्या उपस्थितीत त्या मुलांच्या पालकांच्या स्वाधीन केली. दरम्यानच्या काळात शस्त्रक्रिया व उपचारानंतर मुलगा ठीक झाला. याबाबत आभार मानण्यासाठी मुलासह पालक येथे आले. पिंपळपार येथे देवता चरणी नारळ ठेवून ग्रुपचेही आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT