कोकण

अचानक पुरवठा बंद केल्याने मालवणात पाण्यासाठी धावपळ

CD

अचानक पुरवठा बंद केल्याने
मालवणात पाण्यासाठी धावपळ
पालिकेचा कारभारः नागरिकांत संताप
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २९ : येथील पालिकेमार्फत धामापूर नळपाणी योजनेद्वारे मालवणात सध्या एक दिवस आड होणारा पाणीपुरवठा अचानक बंद केल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. पाणीपुरवठा बंद ठेवण्याबाबत पालिकेने कोणतीही पूर्वसूचना न दिल्याने नागरिकांसह हॉटेल, निवासव्यवस्था धारकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागली.
पालिकेद्वारे सध्या शहरात होणारा पाणीपुरवठा एक दिवस आड होत आहे. यातही काही ठिकाणी नियमितता दिसून येत नाही. या नळपाणी योजनेतील धामापूर तलावातून पाणी सक्शन करणाऱ्या दोन पंपांपैकी एक पंप बंद पडला असल्याने पाणीपुरवठ्यात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात काही ठिकाणी अचानक पाणीपुरवठा बंद केल्याने नागरिकांना त्रास सहन करावा झाला. याविषयी कोणतीही पूर्वकल्पना पालिकेकडून दिली गेली नाही. यामुळे नागरिकांकडील पाणीसाठा संपल्याने पाणीसाठ्याची इतर कोणतीही व्यवस्था करून ठेवू न शकल्याने नागरिकांची धांदल उडाली.
नागरिकांनी इतरत्र धावधाव करून पाणी मिळविले. तर काही निवास व्यवस्था धारक नागरिकांना पर्यटकांची पाण्याची गरज भागवताना नाकीनऊ आले. सागरी पर्यटन बंद झाले असले तरी सध्या मालवणात पर्यटकांचा राबता असल्याने होमस्टे व हॉटेलवर थांबलेल्या पर्यटकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी काहींनी पाण्याच्या टँकरलाही पाचारण केले. पालिकेच्या या कारभाराबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Sakal Podcast: शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT