कोकण

‘मळेवाड-कोंडुरे गावांसाठी कायमस्वरुपी तलाठी द्या’

CD

05838
हेमंत मराठे

‘मळेवाड-कोंडुरे गावांसाठी
कायमस्वरुपी तलाठी द्या’
मळेवाड ः मळेवाड कोंडुरे गावांसाठी कायमस्वरूपी तलाठी द्यावा, अशी मागणी उपसरपंच हेमंत मराठे यांनी केली आहे. मळेवाड कोंडुरे गावासाठी दीड वर्षांहून अधिक काळ कायमस्वरूपी तलाठी नसल्याने शेतकरी, विद्यार्थी व शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे तातडीने कायमस्वरूपी तलाठी रुजू करावा, अशी मागणी सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्याकडे उपसरपंच मराठे यांनी निवेदन देऊन केली आहे. मागणीचा गांभीर्याने विचार करावा; अन्यथा प्रांताधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थ व शेतकऱ्यांसमवेत उपोषण छेडू, असा इशाराही मराठे यांनी दिला.
...............
सावंतवाडीत शुक्रवारी ‘थर्ड आय’चे प्रकाशन
सावंतवाडी ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला साडेतीनशे वर्षे होत असल्याने सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली व छत्रपती शिवाजी कृषी विद्यालय, किर्लोसच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता. २) सकाळी अकराला येथील हॉटेल पर्ल येथे मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत. सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, ब्रिगेडियर सुधीर सावंत मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी ब्रिगेडियर सावंत लिखित ‘थर्ड आय’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा व्याख्यान, देखावा, गीत सादरीकरण व मान्यवरांचे मनोगत अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचे सचिव सुनील राऊळ, प्रा. नितीन गावडे, छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोसचे प्रा. योगेश पेडणेकर यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

SCROLL FOR NEXT