कोकण

पावस-जयगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम

CD

फोटो ओळी
-rat२p२१.jpg-
KOP२३M०६५७९
जयगड (ता. रत्नागिरी) ः जयगड किल्ल्यावर प्लास्टिक कचरा टाकण्यासाठी ठेवण्यात आलेली कचराकुंडी.


जयगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम
जेएसडब्ल्यूतर्फे आयोजन ; पर्यावरण सप्ताहाचे औचित्य
पावस, ता. २ ः जेएसडब्ल्यूतर्फे पर्यावरण सप्ताहानिमित्त रत्नागिरी तालुक्यातील जयगड किल्ला येथे स्वच्छता करण्यात आली. दरवर्षी ५ जूनला पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनांसाठी विविध उपक्रम केले जातात. यावर्षीही युनिट हेड पेड्डान्ना रामायन यांच्या मार्गदशनाखाली पर्यावरण विभागामार्फत किल्ला स्वछता मोहीम, मालगुंड किनारा स्वछता मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमध्ये जयगड सरपंच फरझाना डांगे, ग्रामपंचायत सदस्य, जेएसडब्ल्यू एनर्जी कंपनीचे एच. आर. हेड राजीव जोशी आणि कर्मचारी आणि कंत्राटदार सहभागी झाले होते.
याप्रसंगी प्लॅस्टिकच्या बॉटल्स एकत्र करण्यासाठी कायमस्वरूपी एक कचराकुंडी ठेवण्यात आली आहे. सदरची कचराकुंडी सरपंच जयगड फरझाना डांगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. पर्यटकांनी प्लास्टिक बॉटल्स इतरत्र न टाकता कचरा कुंडीचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. काचेच्या बॉटल्स, प्लास्टिक बॉटल्स आणि प्लास्टिक असा एक ट्रॅक्टरभर कचरा जमा करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Nirupam: "पवारांनी काँग्रेसकडं प्रस्तावही ठेवला होता की, सुप्रिया सुळेंना..."; विलिनीकरणाच्या विधानावर निरुपम यांचा खळबळजनक खुलासा

Loksabha election 2024 : ''...तर हे राम मंदिराला कुलूप ठोकतील'', अमित शाह नेमकं काय म्हणाले?

Share Market Closing: शेअर बाजार आजही सपाट बंद; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये रिकव्हरी, कोणते शेअर्स तेजीत?

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Latest Marathi News Live Update : अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर शुक्रवारी येणार आदेश

SCROLL FOR NEXT