कोकण

कणकवली पिळणकरवाडीत कचऱ्यामुळे कुत्र्यांचा उपद्रव

CD

06739
कणकवली : येथील मच्छीमार्केटपासून काही अंतरावरील रस्त्यावरच कचरा टाकला जात आहे.

कणकवली पिळणकरवाडीत
कचऱ्यामुळे कुत्र्यांचा उपद्रव

कणकवली, ता.३ : शहरातील पिळणकरवाडी, बांधकरवाडी येथील नागरिक भटकी कुत्री आणि मोकाट जनावरांमुळे त्रस्त झाले आहेत. मच्छीमार्केट ते शाळा क्र. २ कडे जाणाऱ्या रस्त्यावर कचरा टाकला जातो. या कचऱ्यातील खाद्यपदार्थ शोधण्यासाठी भटकी कुत्री आणि मोकाट जनावरे येत असतात. सायंकाळी तसेच रात्रीच्या वेळेस ही कुत्री दुचाकीस्वारांच्या मागे लागत असल्‍याने अपघातही होत आहेत.
कणकवली शहरात नगरपंचायतीच्या माध्यमातून घरोघरी जाऊन कचरा संकलन केला जातो, तरीही काही नागरिक या रस्त्यावरील मच्छीमार्केटपासूनच्या शंभर मीटर परिसरातील रस्त्यावर कचरा टाकतात; मात्र या कचऱ्यातील खाद्य शोधण्यासाठी येणाऱ्या भटक्‍या कुत्र्यांचा मोठा उपद्रव या भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.
पूर्वी या भागातील नागरिक रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेत कचरा टाकत असत; मात्र तेथील जमीन मालकाने आपल्‍या जमिनीमध्ये मातीचा ढिग केल्‍याने आता कचरा थेट रस्त्यावरच टाकला जात आहे. याबाबत येथील नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाकडे तक्रारी करूनही कार्यवाही होत नसल्‍याबाबत नाराजी व्यक्‍त करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT