कोकण

पाडलोस भोम परिसरात आगीत काजू कलमे खाक

CD

06837
पाडलोस : भोम परिसरात लागलेली आग अटोक्यात आणताना ग्रामस्थ. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

पाडलोस भोम परिसरात
आगीत काजू कलमे खाक
बांदा, ता. ३ ः पाडलोस भोम परिसरात आज दुपारी दोनच्या सुमाराला सुमारे तीन एकरावरील काजू बागेस अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. दुपारची वेळ आणि वारा असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले; परंतु सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने मदतीसाठी सरसावले आणि आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत काजू कलमांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तविला.
भोम परिसरात अनेक शेतकऱ्यांनी काजू लागवड व अन्य उत्पन्न घेणारी झाडे, कलमे लावली आहेत. आद दुपारी बागेतून अचानक धूर येत असल्याचे काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. आग लागल्याचे समजताच सर्व ग्रामस्थांनी काजू बागेच्या दिशेने धाव घेतली. पाणी व झाडाझुडपांच्या फांद्या मारत आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत आसोलकर, प्रशांत वराडकर, भरत शेर्लेकर, रमेश करमळकर यांच्या काजू बागांचे नुकसान झाले. जीवाची परवा न करता आग विझविण्यासाठी गेलेले गोपाळ करमळकर आदी शेतकऱ्यांनीही शर्थीचे प्रयत्न केले. ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेतल्याने मोठे नुकसान टळले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Malviya: "आता राहुल गांधी दलितांची माफी मागणार का?" रोहित वेमुला प्रकरणी अमित मालवीय यांचा सवाल

Nepal: नेपाळचे मोठे धाडस! 100 रुपयांच्या नोटेवर छापणार नवा नकाशा; भारताच्या 'या' भागांचा समावेश

Murder In Mahim: पत्रकार, पोलीस अधिकारी अन् मर्डर मिस्ट्री; 'मर्डर इन माहीम'चा ट्रेलर रिलीज, सीरिज 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT