कोकण

यशस्वी उद्योजक सचिन पाकळे

CD

डोके - उद्योजक सचिन पाकळे वाढदिवस विशेष


rat5p32.jpg
07264
सावर्डेः किरण सामंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सचिन पाकळे.
-rat5p33.jpg ः
07265
सावर्डेः साक्षी जड्याळ हिला आर्थिक मदत करताना सचिन व संजय पाकळे.
-------------------

यशस्वी उद्योजक सचिन पाकळे

धाडसी, परोपकारी, क्रीडा, शिक्षणप्रेमी, अभ्यासू, यशस्वी उद्योजक सचिन पाकळे व बंधू संजय पाकळे यांनी वडिलांनी सुरू केलेल्या व्यवसायात गरूडझेप घेतली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात यशस्वी उद्योजक बिरूदावली प्राप्त करणाऱ्या सचिन पाकळे यांचा आज (मंगळवारी) वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा....
---------

चिपळूण तालुक्यातील निवळी गावातून व्यवसायाच्यादृष्टीने वडील (कै.) सुभाष पाकळे यांनी सावर्डे गावी आपले पहिले पाऊल टाकले. वडिलांनी सुरू केलेल्या कात उत्पादन क्षेत्राला आधुनिकीकरणाच्या साह्याने सचिन व संजय पाकळे या दोन बंधूंनी यशोशिखरावर पोचवले. कात उत्पादनातील गोळी ते बिस्कीट व लेदरसाठी वापरत येणारी पावडर, अशी उत्पादने घेत कोकण ते दुबई, चीन, व्हिएतनाम याठिकाणी निर्यात करत एक्स्पोर्ट व्यवसायात पदार्पण करत जागतिक बाजारपेठेत पाय रोवले आहेत.
वडील सुभाष पाकळे, आई शीला पाकळे अत्यंत कष्टाला परखड स्वभावाचे. आई जिल्हा परिषद शिक्षक सेवेतून निवृत्त. वडिलांनी चुल्यावर सुरू केलेल्या कात उत्पादनाला स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर आधुनिकतेची कास धरावी, या हेतूने दूरदृष्टीने सचिन व संजय पाकळे यांनी सुप्रसिद्ध उद्योजक संजय घोडावत यांच्या मार्गदर्शनाखाली या व्यवसायात न डगमगता नवे पाऊल टाकले आणि यशस्वीही झाले. जिल्ह्यातील खेड, सुकिवली, सावर्डे, दहिवली, खरवते येथे सचिन कात इंडस्ट्रीज, तिरूपती कात कंपनी, गगनगिरी कात कंपनी अशी तीन भव्य कारखान्यांची निर्मिती करून चुल्यावरून बॉयलरद्वारे उत्पादन सुरू केले. २३ वर्षे मागे वळून न बघता जिल्हा व राज्यात यशस्वी उद्योजक म्हणून भरारी घेतली. त्यांच्या यशस्वी वाटचालीची शासनस्तरावर दखल घेत रत्नागिरीला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाचा उद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाकळे यांच्या उद्योगक्षेत्रातील कारभारात आई शीला पाकळे, भाऊ संजय पाकळे, वहिनी पूनम, पत्नी मेघा या सर्वांचा हातभार महत्वाचा आहे. या उद्योगाबरोबर कन्स्ट्रक्शन क्षेत्रात पदार्पण करण्याचा संकल्प केला आणि तिरूपती कन्स्ट्रक्शन कंपनीची स्थापना केली. या कंपनीने १३ वर्षात मोठी भरारी घेतली आहे. रस्ते, धरण बांधकामात जिल्ह्यात नावारूपास येण्यास मान मिळवला आहे तर पेट्रोलपंप अशा विविध रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या व्यवसायात पाकळे यांनी झेप घेतली. यामध्ये पालकमंत्री उदय सामंत आणि उद्योजक किरण सामंत यांच्यासह आमदार शेखर निकम यांचे पाठबळ राहिले आहे.
सचिन पाकळे यांच्या दूरदृष्टीमुळे कात उत्पादन व कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून अनेक कुशल व अकुशल बेरोजगारांना काम मिळाले असून वेल्डिंग, कार्पेन्टर, रंगकाम, वाहनदुरुस्ती अशा अनेक उद्योजकांना स्वतःचा उद्योग करण्याची संधी मिळाली आहे. या मिळालेल्या यशामुळे भारावून न जाता जिल्ह्यातून येणाऱ्या गरजूंना सन्मानाने मदत द्यायची; मात्र प्रसिद्धीपासून कायम दूर राहून परोपकारी वृत्ती सांभाळण्याचे काम करत असून, कबड्डीपटू अर्जुन पुरस्कार अशोक शिंदे, प्रताप शिंदे ते ग्रामीण भागातील मैदानात कष्टाने खेळणाऱ्या खेळाडूला मदतीचा हात सदैव पुढे असतो. शेखर निकम युवामंच, यंग बॉईज क्रिकेट क्लबच्या माध्यमातून क्रीडाक्षेत्राला उत्तेजन देण्याचे काम निर्विवाद व निरपेक्ष गेली ३३ वर्ष सचिन पाकळे करत आहेत. राजकरणापासून चार हात कायम दूर असणाऱ्या व ग्रामीण भागातील रुग्ण, शैक्षणिक मदत सढळ हस्ते मदत करणाऱ्या या तरुण उद्योजक सचिन पाकळे यांना अनेक क्षेत्रात उज्ज्वल यश प्राप्त व्हावे, ही श्री चरणी प्रार्थना.

- संदीप घाग, सावर्डे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli west Building incident : मोठी बातमी! डोंबिवली पश्चिमेतील 25 कुटुंब राहत असलेली चार मजली इमारत खचली!

Rahul Gandhi and Mallikarjun Kharge: ...म्हणून यंदा राहुल गांधी अन् खर्गे लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला गेले नाहीत!

Lionel Messi चा तीन दिवसीय भारत दौरा, मुंबईत वानखेडेसह ब्रेबॉनवरही खेळणार, कधी आणि केव्हा? वाचा संपूर्ण वेळापत्रक

Love Jihad : हैदाराबादेत 'लव्ह जिहाद'चं प्रकरण उघडकीस; मूळचा पाकिस्तानी असणाऱ्या भामट्याने हिंदू मुलीला फसवलं अन्...

Maharashtra Rain Alert: पुढील दिवस महत्त्वाचे! मुंबईला मुसळधारेचा इशारा, महाराष्ट्रात कसे असेल हवामान?

SCROLL FOR NEXT