कोकण

तीन वर्षांपेक्षा अधिक काळ झालेल्यांची बदली करा

CD

‘त्या’ अधिकाऱ्यांच्या बदल्या करा
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; चांगल्या सुविधा द्या, अन्यथा खैर नाही
लांजा, ता. ६ः जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांनी लांजा ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली आणि तेथील कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. कामचुकारांना फैलावर घेत तीन वर्षांपेक्षा अधिक काळ ठाण मांडून बसलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या तत्काळ बदल्या करा, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी जिल्हा शल्यचिकित्सक संघमित्रा फुले यांना दिले.
मुंबई-गोवा महामार्गावर वसलेल्या लांजा ग्रामीण रुग्णालयाची अतिशय दुरवस्था झाली आहे. रुग्णांना मिळणाऱ्या अपुऱ्या सोयीसुविधा यामुळे जनता त्रस्त आहे. याचा पाढा लांजा ग्रामीण रुग्णालय येथे जिल्हाधिकारी सिंग यांनी भेट दिल्यानंतर प्रत्यक्ष अनुभवास आला. कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे तालुक्यातील जनतेला पुरेशा वैद्यकीय सोयसुविधा मिळत नाहीत, ही खंत नागरिकांनी बोलून दाखवल्यानंतर जिल्हाधिकारी सिंग यांनी या सर्व वैद्यकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. ग्रामीण रुग्णालयात असलेले ‘क्ष’ किरणसाठी फिल्म उपलब्ध नसणे किंवा सर्पदंशावरील लस उपलब्ध नसणे तसेच किरकोळ स्वरूपात दाखल होणाऱ्या रुग्णांना रत्नागिरी येथे जाण्याचा सल्ला देणे यासारख्या लांजा ग्रामीण रुग्णालयाच्या कारभाराचा पाढा नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी या सर्व कर्मचाऱ्यांची कानउघडणी केली.
ग्रामीण रुग्णालयाचा बेजबाबदार कारभार लक्षात घेऊन जिल्हाधिकारी सिंग यांनी तत्काळ या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक यांना पाचारण करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा शल्य चिकित्सक संघमित्रा फुले या ग्रामीण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी सिंग यांनी लांजा ग्रामीण रुग्णालयात तीन वर्षांपेक्षा अधिक काळ ठाण मांडलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या तत्काळ बदल्या करा, अशा सूचना दिल्या. त्याचबरोबर अन्य सर्व अधिकारी, कर्मचारी यांनीदेखील आपल्या कारभारात सुधारणा करा. तालुक्यातील जनतेला चांगल्या वैद्यकीय सुविधा द्या. अबाळ होणार नाही याची काळजी घ्या अन्यथा तुमची काही खैर नाही, अशा शब्दांतदेखील त्यांनी कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचं जालन्यात इमर्जन्सी लँडिंग

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Shilpa Shetty: शिल्पाच्या मुलाला पंजुर्लीने दिला आशीर्वाद! काय आहे शिल्पाचं कांतारा कनेक्शन ?

Big Discount: केंद्रानंतर 21 राज्यांनी केली घोषणा! जुनी कार स्क्रॅप करून नवीन कारवर मिळेल 50 हजारांची सूट

SCROLL FOR NEXT