कोकण

चिपळुणात श्री सदस्यांनी घेतला स्वच्छतेचा वसा

CD

ratchl६३.jpg
०७४४९
चिपळूणः महास्वच्छता अभियानात सहभागी झालेले श्री सदस्य.
--------
धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून चिपळूण शहर चकाचक
१२०० किलो कचऱ्याचे संकलन ; शेकडो श्री सदस्य उतरले रस्त्यावर
चिपळूण, ता. ६ः महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे चिपळुणात महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. या वेळी प्रतिष्ठानचे शेकडो श्री सदस्य शहरात स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरले. त्यांनी ओला कचरा ७०० किलो तर सुका कचरा ५०० किलो असा एकूण १२०० किलो कचरा गोळा करून संपूर्ण शहर चकाचक केले.
ही स्वच्छता मोहीम स्वच्छ भारत अभियानाचे स्वच्छतादूत डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली होती. या अभियानात शहरातील श्री सदस्यांनी संपूर्ण शहरामध्ये चिंचनाका ते पॉवर हाऊस, अर्बन बँक ते भेंडीनाका, खेडेकर संकूल ते भेंडीनाका, पॉवर हाऊस ते पागनाका आदी भागातील रस्त्यांची साफसफाई करून शहर चकाचक केले. श्री सदस्य सकाळी सात वाजता झाडू, घमेली, कुदळ आणि फावडी, खुरपी, रिकामी पोती घेऊन हातात हँडग्लोझ, तोंडाला मास्क लावून स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरले होते. रस्त्यांवर दुतर्फा असणारा कचरा, गवत, बाटल्या, झाडी, प्लास्टिक हटवण्यासोबतच नाले साफसफाईदेखील श्री सदस्यांनी केली. संकलित केलेला कचरा टाकण्यासाठी चिपळूण पालिकेने डंपर तसेच श्री सदस्यांनी वाहनांची व्यवस्था केली होती. प्रतिष्ठानतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिर, शैक्षणिक साहित्य वाटप, वृक्ष लागवड व संवर्धन, निर्माल्य संकलन व खतनिर्मिती, बंधारे निर्मिती असे अनेक विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात.

चौकट
दर महिन्याच्या चौथ्या रविवारी स्वच्छता
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रस्ते दत्तक घेऊन ते वर्षभर स्वच्छ ठेवण्याचे अभियान राबवले आहे. या अभियानात दर महिन्याच्या चौथ्या रविवारी रस्ते साफ करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून ४ जूनला हे अभियान राबवण्यात आले. या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT