कोकण

फोटोसंक्षिप्त-विहिरीत पडलेल्या गायीला मालवणवासीयांकडून जीवदान

CD

फोटोसंक्षिप्त

टीपः swt८१५.jpg मध्ये फोटो आहे.
मालवण ः भरड येथे विहिरीत पडलेल्या गायीला जीवदान देण्यात आले.


विहिरीत पडलेल्या गायीला
मालवणवासीयांकडून जीवदान
मालवण, ता. ८ : शहरातील भरड येथील निर्मिती नर्सरी नजीक सुरू असलेल्या इमारत बांधकामाच्या ठिकाणी विहिरीत गाय पडल्याची घटना काल (ता. ७) दुपारी ४ च्या सुमारास घडली. गायीला युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई यांनी नागरिकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढून तिला जीवदान दिले. विहिरीत गाय पडल्याचे तेथील ठेकेदार नीलेश नाईक यांच्या निदर्शनास आले. सुदैवाने विहिरीत पाणी कमी असल्याने ती पाण्यात उभी राहिली होती. त्यांनी याबाबत सामाजिक कार्यकर्ते व प्राणिमित्र देसाई यांना संपर्क साधून कळविले. यावेळी जवळच आपल्या कामाच्या ठिकाणी असणारे देसाई हे आपल्या दोन कामगारांसह तत्काळ त्या ठिकाणी दाखल झाले. महेश ठाकूर व शशिकांत लुडबे यांनी विहिरीत उतरून गायीला दोरीच्या साहाय्याने बांधले. त्यानंतर स्थानिक नागरिकांना पाचारण करीत त्यांच्या मदतीने दोऱ्या ओढून गायीला सुखरूप बाहेर काढले. यात गायीला कोणतीही इजा झाली नाही. गाय बाहेर आल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. यावेळी नीलेश नाईक, विद्याधर मेस्त्री, विनायक रेडकर, आगोस्तीन (मधलो) डिसोझा, भूषण मेतर व इतर नागरिकांचे सहकार्य लाभले.

टीपः swt८१६.jpg मध्ये फोटो आहे.

मुळदे ः उद्यानविद्या महाविद्यालय मुळदेत कुलगुरू डॉ. संजय भावे नियुक्तीबाबत मिरवणुक काढण्यात आली

डॉ. भावेंच्या नियुक्तीबाबत
''उद्यानविद्या''मध्ये मिरवणूक
कुडाळ ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे १५ वे कुलगुरूपदी डॉ. संजय भावे यांची नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीबद्दल उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथे काल (ता. ७) भव्य मिरवणूक काढली. यावेळी उद्यानविद्या मुळदेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रदीप हळदवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक वर्ग, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या उपस्थितीत ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. डॉ. संदीप गुरव यांनी प्रास्ताविकामध्ये कुलगुरू डॉ. भावे यांच्या कार्याचा आढावा विशद केला. डॉ. हळदवणेकर यांच्यासह प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी नवनियुक्त कुलगुरू डॉ. भावे यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. परेश पोटफोडे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT